ruturaj gaikwad opens up on captaincy of chennai super kings after csk vs kkr match amd2000 twitter
Sports

Ruturaj Gaikwad Statement: 'निर्णय अजूनही धोनीचेच..' कर्णधारपदाबाबत ऋतुराज गायकवाडचा मोठा खुलासा

Ruturaj Gaikwad On Captaincy: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Ruturaj Gaikwad Statement:

चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयाची गाडी अखेर रुळावर आली आहे. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर अखेर चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद ६७ धावांचं योगदान दिलं. दरम्यान हा सामना झाल्यानंतर एमएस धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ' मला जुन्या गोष्टी आठवल्या. मी आयपीएल स्पर्धेत जेव्हा पहिल्यांदा अर्धशतक झळकावलं होतं. त्यावेळी देखील माही भाई (धोनी) माझ्यासोबत होते आणि मी सामना फिनिश केला होता.' आयपीएल २०२४ स्पर्धेच्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्ज संघाने मोठा निर्णय घेतला होता. स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून संघाचं नेतृत्व करणाऱ्या एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली. (Cricket news in marathi)

तसेत तो पुढे म्हणाला की, ' या संघातील खेळाडूंना काही सांगण्याची आवश्यकता भासत नाही. सर्वकाही चांगल्या स्थितीत आहे. एमएस धोनी आणि प्लेमिंग अजूनही निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. आम्हाला जे यश मिळालं आहे, ज्या गोष्टी आम्ही करतोय, त्यात आम्हाला कुठलाही बदल करायचा नाहीये. मला जितकं शक्य होईल तितकं खेळाडूंना मोकळ्याने खेळू द्यायचं आहे. कारण जेव्हापासून मी या संघात आलो आहे, तेव्हापासून संघाचं वातावरण असंच आहे. मला त्यात कुठलाही बदल करायचा नाही. मी या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेतोय.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर १३७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने १७.४ षटकात सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

SCROLL FOR NEXT