Ruturaj Gaikwad x
क्रीडा

Ruturaj Gaikwad: महाराष्ट्राच्या संघात ऋतु'राज', रणजी ट्रॉफीसाठी करणार संघाचं नेतृत्व

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने 2024-25 रणजी करंडक हंगामासाठी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिलीये. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर घेणाऱ्या केधर जाधवची जागा ऋतुराज घेणार आहे.

Bharat Jadhav

ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. गायकवाडने ही जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली. टीम इंडियासाठीही ऋतुराजने चमकदार कामगिरी केली. झिम्बाब्वे दौऱ्यातही त्याने चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं, तरीही श्रीलंका दौऱ्यासाठी त्याचे टी २० किंवा एकदिवशी सामन्याच्या संघातही त्याची निवड झाली नाही. यामुळे त्याचे चाहते खूपच निराश झाले होते, पण आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आता त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र संघाची जबाबदारी याआधी केदार जाधव याच्या खांद्यावर होती.

आयपीएलच्या मागील सत्रात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं नेतृत्त्व ऋतुराज करत होता. आयपीएलच्या सामन्यांमध्ये त्याने सीएसके संघाचं उत्तमरित्या ही जबाबदारी पार पाडली निभावलं, परंतु त्याचा संघ प्लेऑफमध्ये पात्र होऊ शकला नाही. या स्पर्धेदरम्यान ऋतुराजने उत्तम फलंदाजी करत चांगली वैयक्तिक धावसंख्या जोडली होती. त्याने १४ सामन्यात १४१ च्या स्ट्राइक रेटने ५८३ धावा केल्या. यासह टीम इंडियासाठी त्याने चांगली कामगिरी केलीय.

याशिवाय तो टीम इंडियासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल होतं. या कामगिरीचा विचार करूनच त्याला महाराष्ट्र संघाने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

दरम्यान महाराष्ट्रासाठी मागील रणजी ट्रॉफीची स्पर्धा चांगली गेली नाही. मागील स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ २०२३-२४ च्या सत्रात ७ सामने खेळल्यानंतर १ सामना जिंकू शकला होता. तर तीन सामन्यामध्ये पराजय आला तर तीन सामने रद्द झाले होते. याप्रकारे महाराष्ट्राचा संघ एलिट ग्रुपमध्ये सातव्या नंबरवर राहिला. ही स्थिती बघता संघाला एक यशस्वी कर्णधार हवा होता. एका अनुभवी कर्णधाराचा शोध ऋतुराज गायकवाडच्या रुपामने पूर्ण झाला. ऋतुराज यंदा महाराष्ट्राला रणजी ट्रॉफी मिळवून देईल, अशी अपेक्षा संघाला आहे.

आता यंदा २०२४-२५ च्या स्पर्धा ऑक्टोबर महिन्यातील ११ तारखेपासून सुर होणार आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना जम्मू-काश्मीरच्या विरुद्धात होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आलीय. २८ जणांचा संघ रणजी ट्रॉफीसाठी घेण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT