ruturaj gaikwad twitter
क्रीडा

Ruturaj Gaikwad Catch: अद्भुत, अविश्वसनीय! तुफानी खेळीनंतर ऋतुराजचा मॅच विनिंग कॅच; VIDEO एकदा पाहाच

Best Catches Of IPL 2023: ऋतुराजने क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

GT VS CSK,IPL 2023: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२३ स्पर्धेतील क्वालिफायरचा पहिला सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला १५ धावांनी धूळ चारली.

यासह आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या ऋतुराजने क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

ऋतुराजचा अविश्वसनीय झेल..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने महत्वपूर्ण खेळी केली. त्याने ४४ चेंडूंचा सामना करत ६० धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत विजय शंकरचा झेल टिपला.

तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी सुरू असताना १८ वे षटक टाकण्यासाठी मथिशा पथिराना गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजय शंकरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा प्रयत्न फसला. ऋतुराज गायकवाडने डीप मिड विकेटला धावत जाऊन डाईव्ह मारली आणि भन्नाट झेल टिपला. हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर विजय शंकरला या सामन्यात अवघ्या १४ धावा करता आल्या. (Latest sports updates)

चेन्नईचा विजय...

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूंचा सामना करत ६० धावांची खेळी केली.

तर डेवोन कॉनव्हेने ४० धावांची खेळी केली. शेवटी रवींद्र जडेजाने २२ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर चेन्नईला २० षटक अखेर ७ गडी बाद १७२ धावा करता आल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर शेवटी राशिद खानने ३ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ३० धावांची खेळी केली. मात्र गुजरातचा संघ विजयापासून १५ धावा दूर राहिला.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT