Virat Kohli: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आयपीएल २०२३ स्पर्धेतील प्रवास संपला आहे. या संघाने प्लेऑफमध्ये जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र शेवटच्या सामन्यात पराभव झाल्याने या संघाला प्लेऑफमध्ये जाता आलं नाही.
गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला होता.
दरम्यान स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच तो भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.
विराट कोहलीने २३ मे रोजी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने असे लिहीले की, या हंगामात असे काही आले जे कधीच विसरता येणार नाही. आम्ही आमचे आव्हान गाठण्यात अपयशी ठरलो. आम्ही निराश आहोत, मात्र नेहमी ताठ मानेने जगायला हवं. ज्यांनी संघासाठी मनापासुन कामगिरी केली, त्यांचे मी मनापासुन आभार मानतो. मी आमचे प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक आणि सहखेळाडुंचे आभार मानतो. जोरदार कमबॅक करणं हे आमचं लक्ष्य असणार आहे.' (Latest sports updates)
विराट कोहलीने या हंगामात जोरदार कामगिरी केली आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरूध्द झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात त्याने गुजरात टायटन्स संघाविरुध्द झालेल्या सामन्यात देखील शतकी खेळी केली.
मात्र ही खेळी व्यर्थ गेली कारण, या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर जोरदार विजय मिळवला होता. याच पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला होता.
कोहलीची अप्रतिम फलंदाजी..
या संपुर्ण हंगामात विराट कोहलीने जोरदार कामगिरी केली आहे. त्याने या हंगामातील १४ सामन्यांमध्ये ६३९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत.
त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम मोडून काढला आहे. त्याच्या नावे ७ शतकांची नोंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.