flop players of ipl
flop players of ipl saam tv

5 Flop Players In IPL 2023: नाम बडे और दर्शन छोटे..कोट्यवधींची बोली लावूनही फ्लॉप ठरलेले ५ खेळाडू

Flop Players Of IPL 2023: काही खेळाडूंना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही

IPL 2023 Analysis: आयपीएल २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्पयात पोहोचली आहे. या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे लवकरच या स्पर्धेचा विजेता कोण होईल याचा निकाल लागणार आहे.

दरम्यान या हंगामात काही स्टार खेळाडू खेळताना दिसून आले. ज्यांना फ्रांचायजींनी कोट्यवधींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. यातील खेळाडू चमकले.

तर काही खेळाडूंना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यात काही बड्या खेळाडूंचा समावेश आहे. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.

flop players of ipl
Why RCB Fails In IPL?: RCB चं नेमकं गंडतंय तरी कुठं? १६ वर्षे,अर्धा डझन कर्णधार बदलूनही IPL ची ट्रॉफी नाही! ३ प्रमुख कारणे

१) हॅरी ब्रुक: आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला १३ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र तो आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करू शकला नाही. या हंगामातील ११ सामन्यांमध्ये त्याला केवळ १९० धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

२) सॅम करन: सॅम करन हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला पंजाब किंग्ज संघाने १८.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र या स्पर्धेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नाही. शिखर धवनच्या अनुपस्थितीत त्याला पंजाब किंग्ज संघाची जबाबदारी दिली गेली होती. मात्र इथे देखील तो फ्लॉप ठरला होता. (Latest sports updates)

flop players of ipl
Virat Kohli Record: विराट म्हणजे १०१ नंबरी सोनं! शतकी खेळी करत मोडला IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड

३) जोफ्रा आर्चर: मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात जोफ्रा आर्चरला ८ कोटींची बोली लावत खरेदी केले होते. या हंगामात तो खेळण्यासाठी भारतात आलाच नव्हता. त्याने आयपीएल २०२३ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी पदारपण केले. मात्र या हंगामातही त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही . त्याला ५ सामन्यांमध्ये केवळ २ गडी बाद करता आले. दरम्यान दुखापतीमुळे तो आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

४) मुकेश कुमार : दिल्ली कॅपिटल्स संघाने वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला ५.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. या गोलंदाजाकडून दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या फॅन्सला निराश केलं आहे.

५) बेन स्टोक्स : आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बेन स्टोक्सला टार्गेट केलं होतं. इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूकड्न देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र दुखापतीमुळे त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर त्याला आयपीएल २०२३ स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com