rupal chaudhary, World Athletics U20 Championships 2022, Hima Das, India saam tv
Sports

U-20 World Athletics C'ships : रुपल चौधरीनं पटकाविलं ब्राॅंझ; ऍथलिट हाेण्यासाठी वडिलांसमाेर बसली हाेती उपाेषणास

याआधी (4X400 मिश्र रिलेत) भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात रुपलनं भूमिका बजावली हाेती. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक आहे.

Siddharth Latkar

World Athletics U20 Championships 2022: कोलंबिया येथे सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटातील चार मीटर धावणे क्रीडा (sports) प्रकारात भारताच्या रुपल चौधरीनं (rupal chaudhary) (५१.८५) वेळ नाेंदवीत तृतीय स्थान मिळविलं. तिच्या या यशामुळे देशाच्या खात्यात कांस्यपदकाची भर पडली आहे. (Rupal Chaudhary Latest Marathi News)

या स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या येमी मेरी जॉननं (51.50) तर केनियाच्या डमारिस मुटुंगाने (51.71) अशी वेळ नाेंदवित अनुक्रमे सुवर्ण आणि राैप्यपदक जिंकलं. दरम्यान रुपलच्या कामगिरीनंतर तिचे भारतीय क्रीडाप्रेमीं काैतुक करु लागले आहेत. ढिंग एक्सप्रेस म्हणून सुपरिचित असलेल्या हिमा दास हिच्यानंतर रुपल चाैधरी ही चारशे मीटर धावणे क्रीडा प्रकारात या स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारी देशाची दूसरी खेळाडू ठरली आहे.

या स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्य पदकांसह भारत सध्या इरिट्रियासह पदकतालिकेत संयुक्त सत्तराव्या स्थानावर आहे. यूएसए पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यांसह अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर केनिया (तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य) दुसऱ्या स्थानावर आहे आणि दक्षिण आफ्रिका (दोन सुवर्ण, दोन कांस्य) तिस-या स्थानावर आहे.

रुपलनं एकदा वडिलांसमाेर केलं हाेतं उपाेषण

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रुपल चाैधरीने तिला मेरठमधील एका स्टेडियममध्ये घेऊन जाण्यासाठी तसेच एक ऍथलीट बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांसमाेर उपोषण केले हाेते. ही घटना (सन 2016 आणि 17) मध्ये घडली. रुपल नववी पास झाल्यानंतर तिला तिच्या वडिलांनी मेरठच्या कैलाश प्रकाश स्टेडियममध्ये नेण्याचे वचन दिले. परंतु हे स्टेडिमय तिच्या गावापासून अठरा किलाेमीटर अंतरावर असल्याने तिच्या वडिलांनी त्यास नकार दिला.

तिच्या वडिलांकडून नकार मिळाल्यानंतर ती हट्टाला पेटली. तिने हार न मानता (१२ वर्षांची) आपल्या ध्येयावर कायम राहिली. अखेर सप्टेंबर (2017 मध्ये) रुपलने वडिलांचे मन वळवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांनी वडिलांना तिच्या भुमिकेपुढं हात जाेडत जिद्दीस दाद द्यावी लागली आणि त्यानंतर तिचा खेळातील प्रवास सुरु झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT