CWG : पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरची सुवर्ण कामगिरी (व्हिडिओ पाहा)

देशभरातून सुधीरच्या कामगिरीचे काैतुक हाेऊ लागले आहे.
common wealth games 2022 Indias para powerlifter sudhir wins gold.
common wealth games 2022 Indias para powerlifter sudhir wins gold. saam tv
Published On

Common Wealth Games 2022 : गेल्या दाेन दिवसांत कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय (Indian) खेळाडूंनी देशाचा दबदबा कायम ठेवत पदकांवर माेहाेर उमटवली आहे. पॅरा पॉवरलिफ्टर सुधीर (common wealth games 2022 India's para powerlifter sudhir wins gold) याच्या माध्यामातून भारताच्या पदक तालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. सुधीरने याने दाेनशे बारा किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे. सुधीरने मिळविलेल्या यशानंतर भारताच्या सुवर्णपदकांची संख्या सहा पर्यंत पाेहचली आहे. आगामी काळात विविध क्रीडा (sports) प्रकारात देशास आणखी सुवर्णपदकं मिळतील अशी आशा आहे.

सुधीर याने (134.5) असे विक्रमी गुणासह (212 किलो) वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. अखेरच्या प्रयत्नांत सुधीर (217 किलो) वजन उचलण्यात यशस्वी हाेऊ शकला नाही मात्र त्यामुळे निकालात काही फरक पडला नाही.

common wealth games 2022 Indias para powerlifter sudhir wins gold.
Tulika Maan : वडिलांच्या खूनानंतर सावरली तुलिका मान; बर्मिंगहॅमला तिरंगा फडकल्याचा आनंद, पण...

नायजेरियाच्या इकेचुकवू क्रिस्टियन उबिचुकवू याने (133.6) गुणांसह रौप्य तसेच स्कॉटलंडच्या मिकी युल याने (130.9) गुणांसह कांस्यपदक मिळविले. क्रिस्टियनने (197 किलो) तर युलने (192) किलो वजन उचलले.

भारतीय पॅरा पॉवरलिफ्टिर सुधीर याच्या कामगिरीनंतर त्याचे देशातील मान्यवरांसह क्रीडाप्रेमीं अभिनंदन करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com