WPL 2023 Saam tv
क्रीडा

WPL 2023: IPL पेक्षा WPL स्पर्धा आहे जरा हटके! अशा पद्धतीने निवडला जाणार स्पर्धेचा फायनलिस्ट संघ; पाहा स्पर्धेचे नियम

Ankush Dhavre

WPL 2023 Rules: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या अपार यशानंतर आता विमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला सुरुवात होणार आहे. २२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात आजपासून होणार आहे.

स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स (Mumbai indians)आणि गुजरात टायटन्स (Gujarat titans) या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडणार आहे

विमेन्स प्रीमियर लीग ही स्पर्धा आयपीएल स्पर्धेपेक्षा जरा वेगळी असणार आहे. आता काय वेगळं असणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. (Latest sports updates)

तर आयपीएल स्पर्धेत १० संघ असतात. त्यापैकी ३ संघ प्लेऑफ फेरीत प्रवेश करत असतात. मात्र विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत केवळ ३ संघ प्लेऑफ फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

यासह बीसीसीआय आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू करणार आहे. मात्र विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत हा नियम लागू केला जणार नाहीये. (Womens premier league rules)

विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत ४ स्ट्रेटिजिक टाइमआउट असणार आहे. या टाइमआउटचा वापर गोलंदाजी करणारा संघ ६ ते ९ षटकादरम्यान करू शकतो. तर फलंदाजी करणारा संघ या टाइमआउटचा वापर १३ ते १६ षटकादरम्यान करू शकतो.

तर अंपायरने दिलेल्या निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी २ डीआरएस उपलब्ध असणार आहेत. यासह फलंदाजाने ९० सेकंदांच्या आत येणं बंधनकारक असणार आहे.

लीग स्पर्धेत सहभागी होणारे ५ पैकी ३ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. जो संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम राहील, तो संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी झुंज पाहायला मिळेल. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानी असलेला संघ स्पर्धेबाहेर होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT