rudrakshi temkar saam tv
क्रीडा

Raigad: ११ वर्षाच्या रुद्राक्षीनं धरमतर ते मांडवा पाेहत केलं शिवरायांना अभिवादन

शिवजयंती निमित्त रुद्राक्षीने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडची (raigad) जलकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुद्राक्षी टेमकर (rudrakshi temkar) या अवघ्या ११ वर्षीय मुलीने आज (साेमवार) धरमतर ते मांडवा (Dharamtar to Mandwa) हे २६ किलाेमीटरचे अंतर अवघ्या ५ तास ५४ मिनिटांत पाेहून (swimming) पूर्ण करून विक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. शिवजयंतीदिनी रुद्राक्षीने अनाेखा उपक्रम करुन (chhatrapati shivaji maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. (rudrakshi temkar latest marathi news)

रुद्राक्षी ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून तिने रेवस ते गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया पोहून पार केले होते. त्यानंतर तिच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

rudrakshi temkar

रुद्राक्षीने सोमवारी मध्यरात्री दीड वाजता समुद्राच्या लाटांवर झेप घेत धरमतर ते मांडवा हे २६ किलाेमीटरचे सागरी अंतर पोहून पार केले. धरमतर ते मांडवा जेट्टी पोहत पार करणारी रुद्राक्षी पहिली मुलगी ठरली आहे. रुद्राक्षीने हे अंतर ५ तास ५४ मिनिटांत पूर्ण केले. तिच्या या विक्रमाची नोंद घेत अलिबाग, मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी रुद्राक्षीचा सत्कार करून अभिनंदन केले.

Edited By : Siddharth Latkar

rudrakshi temkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT