MI vs RR: आज जो हरला तो संपला!; मुंबई समोर राजस्थानचे आव्हान  Twitter
Sports

MI vs RR: आज जो हरला तो संपला!; मुंबई समोर राजस्थानचे आव्हान

आयपीएलचा 51 (IPL 2021) वा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स (MI) आणि 2008 चा विजेता संघ राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे.

वृत्तसंस्था

आयपीएलचा 51 (IPL 2021) वा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स (MI) आणि 2008 चा विजेता संघ राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. प्लेऑफ च्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांना कोणत्याही किंमतीत सामना जिंकणे आवश्यक आहे. राजस्थानचा संघ हरला तर त्यांचा प्रवास थांबणार आहे. त्याचबरोबर जर मुंबईचा संघ पराभूत झाला तर त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये पोहचणे जवळपास थांबणार आहे. मुंबईला भारतीय स्टार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने या वेळी हॅटट्रिकचे लक्ष्य ठेवून स्पर्धेत प्रवेश केला होता, पण फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाला नुकसान सहन करावे लागले आहे. स्पर्धेच्या 14 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही संघाला विजेतेपदाची हॅट्ट्रिक करता आली नाही. विजेतेपदाच्या हॅटट्रिकपासून संघाच्या वाढत्या अंतराची निराशा कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू शकते. अशा परिस्थितीत त्यांना राजस्थान रॉयल्सला सामोरे जावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध यशवी जयस्वाल आणि शिवम दुबे या दोन खेळाडूंच्या चमकदार खेळीने सामना जिकंला होता. दोन्ही संघांचे समीकरण समान आहे. दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत त्याचबरोबर रन रेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

रॉयल्सचा नेट रन रेट -0.337 आहे, तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईचा नेट रन रेट -0.453 वर घसरला आहे आणि फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे सातव्या क्रमांकावर आहे. मंगळवारी पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल पण विजेत्या संघाला प्लेऑफ मध्ये जाण्याची संधी असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स पुढील सामन्यात विजय मिळवली तर 14 गुणांवर पोहोचणार आहे. +0.294 सह अधिक चांगला नेट रेट आहे. याचा अर्थ असा की जरी मुंबईने मंगळवारी राजस्थानवर मात केली आणि नंतर सनरायझर्स हैदराबादवर त्यांच्या अंतिम सामन्यात विजय नोंदवला तरी प्लेऑफमधील त्यांचे स्थान अद्याप अपष्ट आहे. त्यामुळे रोहित, सूर्यकुमार यादव, इशान किशन, क्विंटन डी कॉक आणि किरॉन पोलार्ड यांना आता त्यांचे सर्वोत्तम द्यावे लागणार आहे. हार्दिक पंड्या पुन्हा लयीत आला आहे.

शारजाची खेळपट्टीही आता चांगली दिसत आहे जी मुंबईच्या फलंदाजांसाठी आनंदाचे कारण असू शकते. रॉयल्सच्या गोलंदाजीत मुस्तफिझूर रहमान हा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत मुंबईचे फलंदाजांना रोखण्यासाठी मुस्तफिजूर, चेतन सकरीया आणि इतर गोलंदाज कोणती रणनीती अवलंबतात हे पाहावे लागणार आहे. त्याचप्रमाणे, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि राहुल चहर सारख्या गोलंदाजांसाठी जयस्वाल आणि एविन लुईस सारख्या फलंदाजांना रोखणे हे आव्हान असणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT