nitish rana twitter
Sports

RR vs CSK, 1st Inning: गुवाहाटीत 'राणा'चा रॉयल शो! राजस्थानने CSK समोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

RR vs CSK 1st Inning Live Score: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ११ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेतील ११ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. गुवाहाटीत सुरु असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला २० षटकअखेर १८२ धावा करता आल्या आहेत. तर चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावांची गरज आहे.

या सामन्याता चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानावर आली. या डावातही यशस्वी जयस्वालला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो ४ धावा करत माघारी परतला. संजू सॅमसनलाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला चांगल्या सुरुवातीचं रुपातंर मोठ्या खेळीत करता आलं नाही. तो १६ चेंडूत २० धावा करत माघारी परतला.

नितीश राणाची शानदार अर्धशतकी खेळी

सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर, नितीश राणाने राजस्थानचा डाव सांभाळला. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ८१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ५ षटकार मारले. कर्णधार रियान परागने १८ चेंडूत २३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकअखेर १८२ धावा केल्या.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

राजस्थान रॉयल्स (Playing XI): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिष थीक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.

चेन्नई सुपर किंग्स (Playing XI): रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एम.एस. धोनी (यष्टीरक्षक), जेमी ओव्हर्टन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पथिराना, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Launch In India: १९ सप्टेंबरपासून iPhone 17 बाजारात विक्रीसाठी दाखल, जाणून घ्या खास अन् दमदार ऑफर्स

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT