CSK VS RR: चेन्नई - राजस्थान आमनेसामने येणार; कोणते शिलेदार मैदान गाजवणार? जाणून घ्या पिच रिपोर्टसह दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ११

CSK VS RR Pitch Report: राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल २०२५ चा सामना बरसापारा स्टेडियमवर होणार आहे. हा सामना ७.३० वाजता सुरु होईल.
CSK VS RR
CSK VS RRgoogle
Published On

आजच्या डबलहेडर सामन्यातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. आयपीएलमधील २०२५ मधील हा ११ वा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर रंगणार आहे. राजस्थान संघ हंगामातील पहिला विजय नोंदवण्यासाठी मैदानात उतरेल.

रियान परागच्या नेतृत्वाखाली संघाला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, गेल्या सामन्यात आरसीबीकडून पराभव पत्करल्यानंतर सीएसके कमबॅक करण्यासाठी मैदानात उतरेल. राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचा प्लेइंग इलेव्हन, पिच रिपोर्ट कसा असेल, जाणून घ्या.

बरसापारा स्टेडियमची पिच कशी असेल ? CSK VS RR Pitch Report

गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमची पिच गोलंदाजांसाठी अुनुकूल आहे. येथील पिच फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना जास्त मदत करते. येथे फिरकी गोलंदाज फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतात. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात केकेआरच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. अशावेळी फिरकी गोलंदाजांना मिळणारी मदत कमी होऊ शकते.

या पिचवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.जर संघाने प्रथम फलंदाजी करून १७५+ धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होऊ शकते. या स्टेडियमध्ये एकूण ५ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम राजस्थान संघाच्या नावावर आहे. त्यांनी दिल्ली विरुद्ध १९९ धावा केल्या. तर या पिचवर दिल्लीने सर्वात कमी धावसंख्या १४२ केल्या आहेत.

गुवाहाटीमध्ये हवामान कसे असेल?

हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार, सामन्यादरम्यान गुवाहाटीमध्ये तापमान सुमारे २८ अंश सेल्सिअस राहील. सामन्याच्यादरम्यान आर्द्रता ५१% ते ६७% दरम्यान असेल तर, तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. पावसाची शक्यता कमी आहे. आज म्हणजे रविवारी डबलहेडर सामने आहे. हा डबलहेडरचा दुसरा सामना असेल. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

CSK VS RR
DC VS SRH: दिल्ली-हैदराबाद भिडणार; कशी असेल दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ११ आणि पिच रिपोर्ट, वाचा

CSK VS RR चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने दोन सामने खेळले आहेत. यापैकी, चेन्नईने एक सामना जिंकला आहे आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२५ मध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. राजस्थानला त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हे राजस्थानचे होमग्राउंड आहे. मात्र, राजस्थान संघाला या मैदानावरही विजय मिळवता आलेला नाही. याच मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानला हरवले होते.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीकशन, तुषार देशपांडे आणि कुमार कार्तिकेय संदीप शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज - रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, दीपक हुडा ,विजय शंकर, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), आर अश्विन, नूर अहमद, खलील अहमद आणि मथिशा पाथिराणा.

CSK VS RR
BCCI Central Contract : वर्ल्डकप गाजवला, IPL मध्ये गरजला, चॅम्पियन्स ट्रॉफीत बरसला; आता मिळणार मोठं गिफ्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com