rcb  yandex
क्रीडा

IPL 2025, RCB: RCB या खेळाडूला घेण्यासाठी बक्कळ पैसा मोजणार! कॅप्टन्सीही देणार; रेकॉर्ड एकदा पाहाच

Royal challengers Bengaluru, IPL 2025: आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ स्टार खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावू शकतो.

Ankush Dhavre

आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून एकापेक्षा एक खेळाडूंनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र कुठल्याही खेळाडूला या संघाला जेतेपदाची ट्रॉफी जिंकून देता आलेली नाही. या संघाने ३ वेळेस स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला.

मात्र तिन्ही वेळेस या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपू्र्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या संघाने आगामी हंगामासाठी ३ खेळाडूंना रिटेन केलं आहे.

ज्यात विराट कोहली, यश दयाल आणि रजत पाटीदार यांचा समावेश आहे. गेल्या हंगामात फाफ डू प्लेसिस या संघाचा कर्णधार होता. मात्र आगामी हंगामापूर्वी त्याला रिलीज करण्यात आलं आहे. त्यामुळे या संघाला कर्णधाराची गरज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आगामी हंगामात अशा खेळाडूच्या शोधात असणार आहे, जो फलंदाजीसह नेतृत्वाची जबाबदारी घेण्यासाठीही सक्षम असेल. त्यामुळे केएल राहुल हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी परफेक्ट ऑप्शन ठरु शकतो.

लखनऊने केलं रिलीज

लखनऊ सुपर जायंट्सने २०२२ मध्ये केएल राहुलला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आगामी हंगामापूर्वी त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केएल राहुलकडे फलंदाजीसह नेतृत्वाचाही चांगलाच अनुभव आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना लखनऊने २ वेळेस प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला संघात घेतलं, तर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते.

कर्णधार म्हणून कसा राहिलाय केएल राहुलचा रेकॉर्ड?

लखनऊ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करण्यापूर्वी केएल राहुलने पंबाज किंग्ज संघाचंही नेतृत्व केलं होतं. त्याच्याकडे ६४ सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. यादरम्यान त्याने ३८ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.

तर २९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान २ सामने बरोबरीत सुटले आहेत. केएल राहुल आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. मात्र अनेकदा त्याच्या स्लो बॅटिंगची चर्चा होत असते. असं असलं तरीदेखील, एकदा मैदानावर टिकला, तर तो मोठी खेळी करुन संघाला विजय देखील मिळवून देतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT