घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Kanguva OTT Release : नुकताच 'कंगुवा' चित्रपट रिलीज झाला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.
Kanguva OTT Release
KanguvaSAAM TV
Published On

साऊथ सुपरस्टार सूर्याचा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. काल (14 नोव्हेंबर) रोजी 'कंगुवा' (Kanguva) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा साऊथ सुपरस्टार सूर्याचा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. या चित्रपटात सूर्यासोबत बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कमाई केली आहे.

सूर्या आणि बॉबी देओलची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते. थिएटर गाजवणारा 'कंगुवा' चित्रपट लवकरच घरबसल्या पाहता येणार आहे. तो ओटीटी (Kanguva OTT Release) प्लॅटफॉर्मवर कुठे आणि कधी रिलीज होणार जाणून घ्या.

मीडिया रिपोर्टनुसार, 'कंगुवा' बहुप्रतीक्षित ॲक्शन चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार आहे. 100 कोटी रुपयांना प्राइम व्हिडीओने 'कंगुवा' चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. पोंगलच्या मुहूर्तावर 'कंगुवा' चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. अद्याप 'कंगुवा' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजच्या डेटची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे. हा चित्रपट 8 आठवड्यांनंतर OTTवर पाहता येणार आहे.

'कांगुवा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'कांगुवा'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 22-24 कोटींची कमाई केली आहे. यात 11 ते 13 कोटींची कमाई तमिळ व्हर्जनमधून झाली आहे. तर हिंदी व्हर्जनमध्ये 'कांगुवा' चित्रपटाने 4 कोटींचा व्यवसाय केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'कंगुवा' चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये 10.16 कोटींची कमाई केली आहे. 'कांगुवा' हा चित्रपट ३५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. हा चित्रपट १० भाषांमध्ये रिलीज झाला आहे. तसेच ३डी मध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.

Kanguva OTT Release
Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com