Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings 
Sports

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings : आयपीएलचा ६८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होतोय. 'करा किंवा मरो' या सामन्यात आरसीबीने दमदार फलंदाजी केली.

Bharat Jadhav

आयपीएलचा ६८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होतोय. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होतोय. नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर आरसीबीने धमाकेदार फलंदाजी करत २० षटकात ५ विकेट गमावत २१८ धावा केल्या. चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी २१९ धावा कराव्या लागतील.

'करा किंवा मरो' या सामन्यात आरसीबीने दमदार फलंदाजी केली. बेंगळुरु संघाला पहिला धक्का विराट कोहलीच्या रुपाने ७० धावसंख्या झाली असताना मिळाला. कोहलीने वैयक्तिक ४७ धावा केल्या, यात ३ चौकार आणि ४ षटकाराचा समावेश आहे. बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपली जबाबदारी ओळखत सीएसकेच्या गोलंदाजांची जोरात धुलाई केली. त्याने ३९ चेंडूत ५४ धावा केल्या, यात ३ चौकार आणि ३ षटकाराचा समावेश आहे. तर रजत पाटीदारनेही फटकेबाजी करत २३ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यात २ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

सीएसकेकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, मिशेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांनी सर्वाधिक धावा दिल्या. देशपांडेने एक विकेट घेत ४९ धावा दिल्या. तर शार्दुल ठाकरने ६१ धावा देत एक विकेट घेतलीय.

दरम्यान दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. एकीकडे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला हा सामना जिंकावा लागेल. तर दुसरीकडे रनरेट सुधारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा सामना जिंकावा लागेल, तरच त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळेल. नाहीतर पराभवासह आरसीबीचा या आयपीएलमधील प्रवास संपेल. दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघ १३ सामन्यांत १४ पॉईंट्ससह चौथ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंज बंगळुरू संघ १३ सामन्यांत १२ गुणांसह ७व्या स्थानावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेइंग ११

आरसीबीचे प्लेइंग ११ -

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग ११

चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन- रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थेक्षाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Routine: रात्रीच्या वेळी 'ही' सात काम कधीचं करू नका, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये वाहतुककोंडी

Saif Ali Khan: सैफ अली खानच्या १५००० कोटींच्या प्रोपर्टीबाबत मोठी अपडेट; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चर्चेत

Vivo V60: सेल्फी येईल एकदम कडक! Vivo आणणार स्टायलिश स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Pune Crime : पुण्यात महिलेनं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT