Royal challengers bengaluru tension increased after rajasthan royals defeat against dc know playoffs scenario amd2000 twitter
क्रीडा

RCB Playoff Scenario: राजस्थानच्या पराभवाने RCB चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक

Royal Challengers Bengaluru Playoffs Scenario After DC vs RR Match: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघाला शेवटच्या षटकात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून राजस्थान रॉयल्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी होती.

मात्र त्यांना या पराभवाचा फार काही फरक पडणार नाही. कारण राजस्थानने आतापर्यंत १६ गुणांची कमाई केली आहे. या सामन्यातील विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं टेन्शन वाढलं आहे. नेमकं कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

दिल्लीचा पराभव हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी फायदेशीर ठरू शकला असता. मात्र आता दिल्लीच्या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. आता इथून पुढे राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जला आपले सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं टेन्शन वाढवणारी आणखी एक बाब म्हणजे सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी १२ गुणांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्रार्थना करावी लागेल की, हे तिन्ही संघ १४ गुणांच्या पुढे जायला नको. इथून पुढे हैदराबाद आणि लखनऊला ३-३ सामने खेळायचे आहेत. या ३ पैकी केवळ १-१ सामना जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्लेऑफचा मार्ग सोपा होईल.

महत्वाचं म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आपल्या उर्वरित तुम्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. या ३ पैकी एकही सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करता येणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT