Royal Challengers bangalore ipl 2024 playoffs scenario in marathi amd2000 twitter
Sports

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Royal Challengers IPL 2024 Playoffs Scenario: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुजरात टायटन्सला नमवत स्पर्धेतील चौथा विजय मिळवला आहे. या विजयानंतर रॉयल चॅलेचंर्स बंगळुरु संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

Ankush Dhavre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुजरात टायटन्सला नमवत स्पर्धेतील चौथा विजय मिळवला आहे. या विजयानंतर रॉयल चॅलेचंर्स बंगळुरु संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ८ गुणांसह -०.०४९ नेट रनरेटसह सातव्या स्थानी झेप घेतली आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. इथून हा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो का? जाणून घ्या कसं असेल समीकरण.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला जर या स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर कुठल्याही परिस्थितीत पुढील ३ सामने जिंकावे लागतील. यासह हा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. सध्या या संघाचा नेट रनरेट -०.०४९ इतका आहे. मात्र पुढील तिन्ही सामने जिंकले, तर नेट रनरेट प्लसमध्ये येऊ शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे केवळ ३ सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने जिंकूनही या संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला अशी प्रार्थना करावी लागेल की, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या हैदराबाद आणि लखनऊने १ पेक्षा जास्त सामने जिंकायला नको. असं झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सातव्या स्थानी आहे. तर चेन्नईचा संघ पाचव्या आणि दिल्लीचा संघ सहाव्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला प्रार्थना करावी लागेल की, या दोन्ही संघांनी २ सामने जिंकायला नको. असं झाल्यास चेन्नई आणि दिल्लीचे १४ गुण होतील. चेन्नईने आतापर्यंत १० पैकी ५ सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने ११ पैकी ५ सामने जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

Maharashtra Politics: निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

Kitchen Hacks : बटाटे कापल्यावर लगेच काळपट पडतात? मग फॉलो करा या टिप्स

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

SCROLL FOR NEXT