RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

RCB vs GT, IPL Match Today: आतापर्यंतचे रेकॉर्ड बघितले तर, ही आकडेवारी काही प्रमाणात बेंगळुरू संघासाठी धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी आहे.
RCB vs GT, Virat Kohli Vs Shubman Gill, IPL Match Today
RCB vs GT, Virat Kohli Vs Shubman Gill, IPL Match TodaySAAM TV

आयपीएलच्या यंदाच्या स्पर्धेतल्या प्रत्येक सामन्यात धक्कादायक आणि तितकेच अनपेक्षित निकाल लागत आहेत. कारण रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्ससारखे तगडे संघ पॉइंट्स टेबलमध्ये तळाला आहेत, यावरून हे सिद्ध होतंय. RCB आणि GT यांच्यात आज, शनिवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये लढत होत आहे. पण आतापर्यंतचे काही रेकॉर्ड बघितले तर, ही आकडेवारी काही प्रमाणात बेंगळुरू संघासाठी धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी आहे.

खोऱ्यानं धावा ओढणारा विराट कोहलीसारखा तगडा खेळाडू असूनही बेंगळुरूचा संघ हा गुणतालिकेत तळाशी आहे. तर गुजरात टायटन्सही आठव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ आज आमनेसामने येत आहेत. यापैकी कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

बेंगळुरू-गुजरात आमनेसामने, आकडेवारी काय सांगते ?

आयपीएलमध्ये बेंगळुरू आणि गुजरात हे दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ ठरलेत. दोघांनी दोन-दोन सामने जिंकले आहेत. पण याआधीच्या म्हणजे २८ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या सामन्यात बेंगळुरूने गुजरातवर ९ विकेटने विजय मिळवला होता.

चिन्नास्वामी मैदानात कोण सरस?

एम चिन्नास्वामी मैदानात बेंगळुरू आणि गुजरातमध्ये एक सामना झालाय. आरसीबीला या मैदानात पराभवाला सामोरे जावे लागले होते. गुजरात सरस ठरला होता. २१ मे २०२३ रोजी गुजरातने याच मैदानावर बेंगळुरूचा सहा विकेट राखून पराभव केला होता.

RCB vs GT, Virat Kohli Vs Shubman Gill, IPL Match Today
Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं! कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर

चिन्नास्वामी मैदानात बेंगळुरूची आतापर्यंतची कामगिरी

एम चिन्नास्वामी मैदानात बेंगळुरूचा संघ ९७ सामने खेळला आहे. त्यातील ४५ सामन्यांत विजय, तर ४७ सामन्यांत पराभव झाला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. तर चार सामने अनिर्णित होते. एप्रिल २०२४ रोजी अखेरचा सामना हैदराबाद विरुद्ध झाला होता. त्या सामन्यात २५ धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं.

सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

विराट कोहली - ४ सामने खेळलाय. ३०२ धावा केल्या आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नाबाद १०१.

शुभमन गिल - ४ डावांत ५० हून अधिकच्या सरासरीने १५२ धावा. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद १०४ आहे.

डेविड मिलरने चार डावांत अवघ्या १०५ धावा केल्या आहेत. त्यात सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३९ इतकी होती.

गोलंदाजांची करामत

गुजरातच्या राशिद खानने चार डावांत ४ विकेट घेतल्यात. ३२ धावा देत २ विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.

वानिंदु हसरंगा यानं दोन डावांत तीन विकेट घेतल्या आहेत. तर मोहम्मद सिराजनं ३ डावांत ३ विकेट घेतल्या आहेत. ३२ धावा आणि २ विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.

RCB vs GT, Virat Kohli Vs Shubman Gill, IPL Match Today
ICC Test Ranking: टी -२० वर्ल्डकपआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाने मागे सोडत गाठलं नंबर १ स्थान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com