Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं! कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर

Rohit Sharma Statement On Captaincy: आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं!कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर
rohit sharma press conference rohit opens up on mumbai indians captaincy question hardik pandya amd2000twitter
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी (२ मे) मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. दरम्यान रोहितला कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तो काय म्हणाला? जाणून घ्या.

गेल्या १० वर्षांपासून रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान त्याने ५ वेळेस संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेतलं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरून काढलं आणि ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं!कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर
IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

दरम्यान कर्णधारपदाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला की, ' हे पाहा, हा आयुष्यातील एक भाग आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या वाटेल तशीच होणार असं नाही. हा एक शानदार अनुभव आहे. यापूर्वी मी कर्णधार नव्हतो. तेव्हाही मी अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. माझ्यासाठी हे नवीन नाही. एक खेळाडू म्हणून तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. गेल्या एक महिन्यापासून मी तेच करतोय.

Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं!कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर
IPL 2024 Points Table: चेन्नईला नमवत पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप!या संघांचं टेन्शन वाढलं

आगामी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर हार्दिक पंड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला या हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने १० पैकी ७ सामने गमावले असून केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाणं ही कठीण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com