Romario shepherd  twitter
Sports

IND VS WI 5th T20I: मास्टरमाईंड शेफर्ड! सूर्या अन् संजूला बाद करण्यासाठी असा रचला सापळा; सामन्यानंतर सांगितला काय होता प्लान

Romario Shepherd: रोमारियो शेफर्डने सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनला बाद करण्यासाठी काय सापळा रचला होता याचा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

IND VS WI 5th T20I Romario Shepherd Plan:

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार पार पडला. मालिकेतील ५ वा आणि निर्णायक सामना फ्लोरिडामध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे .

या सामन्यात भारतीय संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. त्याने या डावात ६१ धावांची खेळी केली. दरम्यान हा सामना झाल्यानंतर वेस्टइंडीजचा गोलंदाज रोमारियो शेफर्डने सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनला बाद करण्यासाठी काय सापळा रचला होता याचा खुलासा केला आहे.

सामना झाल्यानंतर बोलताना रोमारियो शेफर्ड म्हणाला की, 'आम्ही जिंकलो याचा आम्हाला खुप आनंद झाला आहे. चांगली खेळी केल्याबद्दल निकोलस पूरन आणि ब्रँडन किंगचे आभार. वनडे मालिकेपासून ते आतापर्यंत मी चांगली गोलंदाजी करतोय. संजू सॅमसनला बाद करण्यासाठी आमचा सोपा प्लान होता. आम्ही त्याला विकेट टू विकेट गोलंदाजी करणार होतो. तर सूर्यकुमार यादवसाठी खेळपट्टीवर चेंडू आपटण्याचा प्लान होता.'

तसेच मालिका जिंकण्याबाबत तो म्हणाला की, 'हा विजय आमच्यासाठी खुप महत्वाचा आहे. कारण गेले काही महीने आमच्यासाठी खुप कठीण राहीले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला पराभूत करणं आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी अतिशय खास आहे.' (Latest sports updates)

भारतीय संघाचा मालिकेत २-३ ने पराभव..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटक अखेर १६५ धावा केल्या होत्या.

यादरम्यान सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाकडून ब्रँडन किंगने नाबाद ८५ धावांची खेळी करून संघाला सामना जिंकून दिला. वेस्टइंडीजने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यासह ही मालिका ३-२ ने खिशात घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT