IND vs WI 5th T20I: हार्दिकला ओव्हर कॉन्फिडन्स नडला? टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी कुठं? वाचा पराभवाची प्रमुख कारणं

Reasons Behind Team India's Defeat: काय आहेत भारतीय संघाच्या पराभवाची प्रमुख कारणे?
India vs West Indies Reasons Of Team India's Defeat
India vs West Indies Reasons Of Team India's DefeatSaam tv
Published On

India vs West Indies Reasons Of Team India's Defeat: फ्लोरिडाच्या मैदानावर भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील टी -२० मालिकेतील ५ वा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्टइंडीज संघासमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान दिले होते.

या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिका ३-२ ने खिशात घातली आहे. गेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाकडून या सामन्यात काय चूक झाली? जाणून घ्या काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं.

India vs West Indies Reasons Of Team India's Defeat
IND vs WI 5th T20i Highlights: वर्ल्डकपलाही पात्र न ठरलेल्या विंडीजकडून टीम इंडियाचा पराभव; ३-२ ने गमावली टी-२० मालिका

भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज ठरले फ्लॉप..

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजांनी पूर्णपणे फ्लॉप ठरवला. गेल्या सामन्यात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या सलामीवीर फलंदाजांना या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही.

शुबमन गिल ९ चेंडूंचा सामना करत ९ धावांवर माघारी परतला. तर यशस्वी जयस्वाल ४ चेंडूंचा सामना करत अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. या दोन्ही फलंदाजांकडून भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा होती.

मध्यक्रमातील फलंदाजांची सुमार कामगिरी..

भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. सूर्याला आणि तिलक वर्माला वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. संजू सॅमसन १३, हार्दिक पंड्या १४ तर अक्षर पटेल अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. (Latest Sports updates)

India vs West Indies Reasons Of Team India's Defeat
Team India News: विश्रांती नव्हे तर 'या' कारणामुळे विराट,रोहित टी-२० क्रिकेट खेळणं टाळताय

युजवेंद्र चहल..

युजवेंद्र चहल हा टी -२० क्रिकेटमधील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. मात्र महत्वाच्या सामन्यात त्याच्या फिरकीची जादू चालली नाही. ज्या खेळपट्टीवर कुलदीप यादवने केवळ ४.५० च्या इकॉनॉमिने १८ धावा खर्च केल्या. याच खेळपट्टीवर वेस्टइंडीजच्या फलंदाजांनी युजवेंद्र चहलला धू धू धुतला. त्याने या सामन्यात १२.५१ च्या इकॉनॉमिने ४ षटकात ५१ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

हार्दिक पंड्याचे नेतृत्व..

हार्दिक पंड्या कर्णधार म्हणून सपशेल फेल ठरला आहे. त्याला या सामन्यात गोलंदाजांचा योग्य वापर करता आला नाही. या निर्णायक सामन्यात तो विकेट्स घेण्याचा प्रयत्न न करता शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाण्याची प्रयत्नात होता. त्याने या सामन्यात अर्शदीप सिंगचे २, मुकेश कुमारचे ३ षटक शिल्लक ठेवले. तर तिलक वर्माला २ आणि यशस्वी जयस्वालला १ षटक टाकण्याची संधी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com