Rohit Sharma T20 Cricket Saam TV
Sports

Rohit Sharma : रोहित शर्माचा टी-२० संघातून पत्ता कट? दिग्गज खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला विश्वचषकातही..,

भारतीय संघांचा माजी क्रिकेटर वसीम जाफर याने रोहित शर्माबाबत एक मोठं विधान केलं आहे.

Satish Daud

Rohit Sharma T20 Cricket : विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या भारतीय संघाच्या फलंदाजीचे आधारस्तंभ आहेत. या दोन्ही खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. मात्र, असं असून सुद्धा दोघेही बऱ्याच काळापासून टी-२० क्रिकेट खेळले नाही. अशातच, भारतीय संघांचा माजी क्रिकेटर वसीम जाफर याने रोहित शर्माबाबत एक मोठं विधान केलं आहे. (Latest Marathi News)

वसीम जाफरला वाटते की, विराट कोहलीला पुढील टी-२० विश्वचषकात (Cricket News) भारतीय संघात संधी मिळू शकते. पण रोहित शर्माला आता यापुढे टी-२० सामन्यात खेळण्याची संधी कदाचित मिळणार नाही. इतकंच नाही तर तो पुढील टी-२० विश्वचषक सुद्धा खेळू शकणार नाही, असं वसीम जाफर याने म्हटलं आहे.

आपल्या युट्यूब चॅनलवर माजी पाकिस्तानी क्रिकेटर बासित अलीशी झालेल्या संभाषणात जाफरने रोहित शर्माच्या वयाबाबतचा तर्क लावला आहे. जाफर म्हणाला, "आगामी मालिका लक्षात (Sport News) घेऊन कोहली आणि रोहितला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे."

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ हा भारतीय दौऱ्यावर असून तो ४ कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही टीम इंडियासाठी खूप महत्वाची आहे. यातील ३ सामने जिंकून टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी आहे.

पुढे बोलताना वसीम जाफर म्हणाला, भविष्याकडे पाहता टी-२० फॉरमॅटचा खेळ तरुणांसाठी आहे. माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून मला आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात रोहित शर्माची जागा दिसत नाही. कारण रोहितचे वय ३६ वर्ष झालेले आहेत. याच संघात विराट कोहलीचा समावेश असेल, कारण कोहलीची फिटनेस रोहितपेक्षा जास्त असल्याचंही वसीम जाफर म्हणाला.

भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा बराच काळ्यापासून टी-२० क्रिकेटपासून बाहेर आहे. रोहित अखेरचा टी-२० सामना विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. टी-२० विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माचे टी-२० कर्णधारपद काढून घेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT