Cricket News: विश्वचषक विजयाच्या हिरोने अचानक घेतला संन्यास, क्रिकेट चाहत्यांना धक्का!

Joginder Sharma News: भारताच्या मिशन ऑस्ट्रेलियाआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Joginder Sharma
Joginder Sharmasaam tv
Published On

Joginder Sharma Retirement: टीम इंडिया 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. भारताच्या मिशन ऑस्ट्रेलियाआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाचा हिरो असलेल्या खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. 2007 चा टी-20 विश्वचषक भारताला जिंकून देण्यात या खेळाडूचा मोठा वाटा होता.

जेव्हा जेव्हा 2007 च्या T20 विश्वचषकाचा उल्लेख होतो तेव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात जोगिंदर शर्माचे नाव येते. जोगिंदर शर्मानेच फायनल मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचे ओव्हर टाकून टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते. जोगिंदर शर्माने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

Joginder Sharma
Adani Group Latest News: अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तोडले मौन, म्हणाल्या...

39 वर्षीय जोगिंदर शर्मा टीम इंडियासाठी फक्त 4 टी-20 सामने खेळला. मात्र या सामन्यांमध्येच त्याने चांगले नाव कमावले. 2007 च्या T20 विश्वचषकात जोगिंदर भारताच्या विजयाचा हिरो होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच लहान असली ती संस्मरणीय आहे.

जोगिंदर शर्माने 2004 मध्ये टीम इंडियात पदार्पण केले आणि त्यानंतर 2007 मध्ये शेवटचा सामना खेळला. यानंतर तो कधीही टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. विशेष म्हणजे तो सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी म्हणून कार्यरत आहेत.

जोगिंदर शर्माने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत टीम इंडियासाठी एकूण 4 टी-20 आणि 4 एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 4.6 इकॉनॉमीसह धावा देऊन 1 बळी घेतला. तर टी-20 फॉरमॅटमध्ये 9.52 च्या इकॉनॉमीसह धावा देत एकूण 4 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 16 आयपीएल सामनेही खेळले आहेत. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता.

Joginder Sharma
Cricket News : कॅरेबियन खेळाडूने भारतीय गोलंदाजाला धुतलं; एकाच षटकात लगावले ५ षटकार, पाहा VIDEO

भारत आणि पाकिस्तान यांच्यात T20 विश्वचषक 2007 चा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 5 विकेट गमावून 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान 19.3 षटकांत 152 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू मिसबाह-उल-हक वेगवान फलंदाजी करत होता. पण जोगिंदर शर्माने त्याला झेलबाद केले आणि भारताला विजय मिळवून दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com