rohit sharma mumbai indians  yandex
Sports

Rohit Sharma Mumbai Indians: रोहित मुंबई इंडियन्सला करणार रामराम?मोठं कारण आलं समोर

Rohit Sharma IPL News: रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma,Mumbai Indians:

रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मात्र मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पंड्याला संघाचं कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १३ वर्षांपासून मुंबईकडून खेळत असलेला रोहित शर्मा पुढच्या वर्षी दुसऱ्या संघातून खेळताना दिसून येऊ शकतो.

कारण पुढच्या वर्षी आयपीएलचा मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक संघ ४ खेळाडूंना रिटेन करू शकतो. यात ३ भारतीय आणि १ परदेशी खेळाडूचा समावेश असतो. मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसारखे स्टार खेळाडू आहेत. तर रोहितला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीही हार्दिक पंड्याच संघाचा कर्णधार असेल. (Cricket news in marathi)

रोहित सोडणार मुंबईची साथ?

रोहितला कर्णधारपदावरून का काढलं? याबाबत हेड कोच मार्क बाऊचरने मोठा खुलासा केला होता. रोहित शर्मावर नेतृत्वाचा दबाव येतोय. त्यामुळे तो चांगली कामगिरी करू शकत नाहीये. त्यामुळे रोहितला कर्णधारपदावरून काढलं आहे. असं मार्क बाऊचरने म्हटले होते. मार्क बाऊचरची प्रतिक्रिया समोर येताच रोहितची पत्नी रितिका सजदेहने देखील कमेंट करत जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यातील वाद वाढत असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

मुंबई इंडियन्स या ३ खेळाडूंना करू शकते रिटेन..

पुढच्या वर्षी होणाऱ्या मेगा ओक्शनमध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन करू शकते. त्यामुळे रोहित बाहेर पडणार हे जवळ जवळ निश्चित आहे. आता रोहित कोणाकडून खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT