Rohit Sharma Statement: खेळपट्टीवरून टीका करणाऱ्यांवर रोहित भडकला! प्रत्युत्तर देत म्हणाला, ' आम्ही कुठेही जिंकू शकतो..'

India vs England 3rd Test: राजकोटच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर तब्बल ४३४ धावांनी विजय मिळवला.
rohit sharma
rohit sharmatwitter
Published On

Ind vs Eng 3rd Test, Rohit Sharma Statement:

राजकोटच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर तब्बल ४३४ धावांनी विजय मिळवला. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी ४०० धावा केल्या. त्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांना २०० धावा देखील करता आल्या नाहीत. दरम्यान सामन्यानंतर खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना रोहित शर्माने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना म्हटले की, ' आम्ही अशा खेळपट्टीवर यापूर्वीही अनेक सामने जिंकले आहेत. खेळपट्टीवर चेंडू फिरणं हा आमचा मजबूत पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला संतुलन मिळते. आम्ही अशा खेळपट्टीवर अनेक सामने जिंकले आहेत आणि भविष्यातही निकाल आमच्याच बाजूने लागतील. मात्र काही अशा गोष्टी आहेत ज्यावर आम्ही नियंत्रण ठेऊ शकत नाही. जसं की, आम्हाला रँक टर्नर खेळपट्टी हवी आहे की नाही यावर आम्ही चर्चा करत नाही. आम्ही सामन्याच्या दोन दिवसापूर्वी मैदानावर पोहोचतो. दोन दिवसात आम्ही करणार तरी काय?' (Cricket news in marathi)

rohit sharma
Ben Stokes Statement: दारुण पराभवानंतर बेन स्टोक्सचा रडीचा डाव? म्हणतो, ' क्रिकेटमधून हा नियम काढून टाका..'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' खेळपट्टी कशी असेल हे पीच क्युरेटर ठरवतात. आम्ही कुठल्याही खेळपट्टीवर खेळून जिंकू शकतो. आम्ही जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना केप टाऊन कसोटी जिंकली तेव्हा सर्वांना माहीत होतं की, ती खेळपट्टी कशी होती. '

rohit sharma
WTC Points Table: टीम इंडियाला मोठा फायदा; कसोटीत इंग्लंडला पराभूत करताच WTC Points Table मध्ये गरूडझेप

तसेच रोहित पुढे म्हणाला की,' गेल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये आव्हानं वेगवेगळी होती. हैदराबाद कसोटीत चेंडू फिरत होता मात्र खेळपट्टी संथ होती. विशाखापट्टनममध्ये चेंडू उसळी घेत नव्हता. आज तुम्ही पाहिलं असेल की, चेंडू फिरत होता. मात्र खेळपट्टी संथ होती. भारतात अशाच खेळपट्ट्या मिळतात. जर आम्हाला रँक टर्नर खेळपट्टी मिळाली तर आम्ही त्यावरही चांगलीच कामगिरी करू .'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com