T 20 World Cup Team India, Rohit Sharma  saam tv
Sports

Ind vs Aus: दुसऱ्या वनडेत रोहितची एन्ट्री होताच 'या' दिग्गज खेळाडूचा होणार पत्ता कट

Ishan Kishan: आता दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माचे पुनरागमन होणार आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 1st ODI: मुबंईच्या वानखेडे स्टेडीयमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहीला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला.

या विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माचे पुनरागमन होणार आहे.

त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजाला बाहेर बसावं लागणार आहे.

पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून आला होता. तर सलामीवीर फलंदाज म्हणुन शुभमन गिल आणि ईशान किशन यांना संधी दिली गेली होती. (Latest sports updates)

मात्र ईशान किशनला या संधीचा लाभ घेता आला नाही. स्वस्तात माघारी परतल्यामुळे तो दुसऱ्या वनडेतून बाहेर होऊ शकतो.

ईशान किशनच्या पहिल्या वनडेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, तो ८ चेंडूंमध्ये अवघ्या ३ धावा करत माघारी परतला.

त्यामुळे रोहित शर्माचे पुनरागमन झाल्यास ईशान किशन बाहेर होऊ शकतो.

ईशान किशन बाहेर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करतो. शुभमन गिल सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे.

तर केएल राहुलने ७५ धावांची खेळी करत जोरदार कमबॅक केलं आहे. केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडतोय. मालिकेतील दुसरा वनडे सामना १९ मार्च रोजी खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Dev Rashi: 'या' राशींवर शनीदेवाची नेहमीच असते कृपा; प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना मिळतं यश

Maharashtra Live News Update: मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा; पुण्यातल्या महिलेचा अजित पवारांना सकाळीच सल्ला

Xiaomi 14 Civi Offer: सणासुदीला मोठी संधी! Amazon सेलमध्ये Xiaomi 14 Civi वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Sanjay Shirsat News : झालं 'कल्याण' ! मंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार भरपूर नफा

SCROLL FOR NEXT