Rohit Sharma the Master Mind saam tv
Sports

Rohit Sharma: रोहित शर्मा द मास्टर माइंड...! डगआऊटमध्ये बसून हिटमॅनने फिरवला सामना; पाहा कशी हिरावली दिल्लीकडून मॅच?

Rohit Sharma the Master Mind: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने डगआऊटमधून पुन्हा एकदा टीमची सूत्र हातात घेतल्याचं पाहायला मिळालं.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबई इंडियन्सच्या टीमचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. रोहित आयपीएल २०२५ मध्ये सातत्याने मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरतोय. मात्र जरी रोहित चांगली फलंदाजी करू शकत नसला तरीही मुंबई इंडियन्ससाठी नेहमी तो संकटमोचक म्हणून धावून येतो. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात रोहितची मोठी भूमिका मानली जातेय.

या सामन्यात झालं असं की, रोहित शर्माने डगआउटमधून एक सल्ला दिला. जो मुंबईच्या टीमने मैदानावर लगेच अंमलात आणि त्याचं फळ टीमला मिळालं. यामुळे मुंबईने १२ धावांनी सामना जिंकला.

रोहितच्या सल्ल्याने मुंबईने जिंकला सामना

दिल्ली कॅपिटल्सच्या डावादरम्यान रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्याशी चर्चा करत होता. त्यावेळी दिल्ली सामना जिंकणार असं चित्र दिसत होतं. मात्र यावेळी रोहितने डगआउटमध्ये बसून सल्ला दिला की, एक नवीन बॉल घ्यावा आणि दोन्ही बाजूंनी स्पिनर्सचा वापर करा. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा हा सल्ला ऐकला आणि सामन्याचं चित्र क्षणार्धात पालटलं. रोहितच्या सांगण्यानंतर मुंबई इंडियन्सने स्पिनर गोलंदाज कर्ण शर्मा आणि मिशेल सँटनर यांनी तीन ओव्हर्स टाकले. या काळात फक्त १९ रन्स मिळाले आणि कर्ण शर्माने ट्रिस्टन स्टब्स आणि केएल राहुल यांनाही बाद केलं.

यानंतर दिल्लीवर काहीसं प्रेशर वाढू लागलं. दिल्लीचे फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले. जेव्हा ट्रिस्टन स्टब्स बाद झाला तेव्हा डगआउटमध्ये बसलेला पारस म्हांब्रे रोहित शर्माच्या निर्णयाचे कौतुक करताना दिसला.

मुंबईने जिंकला सिझनमधील दुसरा सामना

या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत फारशी खास राहिलेली नाही. सहाव्या सामन्यातील हा टीमचा केवळ दुसरा विजय होता. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना १७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. यावेळी ब्लू आर्मी विरूद्ध ऑरेंज आर्मी असा सामना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT