Rohit Sharma Abhishek Nayar X
Sports

टीम इंडियात काहीतरी घडतंय? कोचिंग स्टाफमधून हटवलेल्या अभिषेक नायरला रोहित शर्मा म्हणाला, थँक्स ब्रो!

Rohit Sharma Abhishek Nayar : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात रोहित शर्माचा फॉर्म परतला. त्याने कालच्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. रोहितने कामगिरीचे श्रेय अभिषेक नायरला दिले.

Yash Shirke

Rohit Sharma : मुंबईचा राजा, हिटमॅन रोहित शर्मा फॉर्ममध्ये आला आहे. कालच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात ४५ चेंडूंवर नाबाद ७६ धावा केल्या. आयपीएल २०२५ मधील सर्वाधिक धावा काल रोहितने काढल्या. या कामगिरीमुळे मुंबईने सामना जिंकला आणि रोहित शर्मा 'प्लेयर ऑफ द मॅच' बनला.

आयपीएल २०२५ सुरु झाल्यापासून रोहित शर्माचा खराब फॉर्म सुरु होता. पहिल्या काही सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप झाला होता. यामुळे मुंबईने रोहितला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवले. कालच्या सामन्यात देखील तो इम्पॅक्ट प्लेयर बनून रायन रिकल्टनसह मैदानात सलामीसाठी उतरला होता. पण सोशल मीडियावर रोहितच्या कालच्या सामन्यातील खेळीपेक्षा त्याच्या आजच्या इन्स्टाग्राम स्टोरीची अधिक चर्चा आहे.

रोहित शर्माने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीत रोहितचा मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यातला फोटो आहे. या फोटोवर त्याने 'थँक्यू ब्रो अभिषेक नायर' असे लिहिले आहे. या स्टोरीद्वारे कालच्या कामगिरीचे श्रेय रोहितने अभिषेक नायरला दिले आहे. खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी नायरने हिटमॅनला मदत केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माने अभिषेक नायरला थँक्यू म्हणत गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे. टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमधून अभिषेक नायरची हकालपट्टी करण्यात आली. त्याला काढून टाकण्याचा निर्णयात गौतम गंभीर यांचा सहभाग होता. यामुळे रोहित नाराज झाल्याचे म्हटले जात आहे. इंडियाच्या कोचिंग स्टाफमधून बाहेर पडल्यानंतर नायरची केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीला रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट मिळणार, खात्यात ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यात

अगं बाई! नवरदेव आणि नवरीचा मांडवात धमाकेदार डान्स; बघता बघता व्हिडिओ झाला VIRAL

Success Story: CA झाला, अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी धुडकावली, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS केशव गोयल यांचा प्रवास

Pune : जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या दोस्तांनी २५ वाहनांची केली तोडफोड

SCROLL FOR NEXT