rohit sharma  twitter
Sports

IND vs BAN: गंभीर-रोहितला डोकेदुखी! केएल राहुल, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंत यांच्यामुळे या तिघांचा पत्ता कट?

Team India News: येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान या मालिकेत भारतीय संघात केएल राहुल आणि रिषभ पंत कमबॅक करताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. वनडे आणि टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतात दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान भारतीय संघातील खेळाडूंना आणि संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनाही ही स्पर्धा खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बांगलादेशविरुद्धची मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फानयलमध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे. त्यामुळे या मालिकेत संघातील प्रमुख खेळाडू कमबॅक करताना दिसून येणार आहे. भारतीय संघ पॉवरहाऊसह मैदानात उतरणार आहे .त्यामुळे कोणत्या ११ खेळाडूंना खेळवायचं यामुळे नक्कीच रोहित शर्माच्या टेन्शनमध्ये वाढ झाली असणार आहे.

या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. तर केएल राहुल आणि रिषभ पंत यांचं देखील कसोटीत कमबॅक होऊ शकतं. या दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीत सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं होतं.

मात्र रिषभ आणि केएल राहुलला प्लेइंग ११ मध्ये स्थान द्यायचं असेल, तर सरफराज आणि ध्रुव जुरेलला बाकावर बसवावं लागेल. या दोन्ही खेळाडूंनी मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, ' मला वाटतंय की, सरफराज खान आणि ध्रुव जुरेलला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण आहे. सुरुवातीला या दोघांनाही संधी मिळणं खूप कठीण आहे. कारण, केएल राहुल आणि रिषभ पंत या मालिकेत खेळणार आहे. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर या खेळाडूपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. भारतीय क्रिकेटमध्ये हे आधीपासून सुरु आहे. मला तरी हेच वाटतंय, यावेळीही काही वेगळं होणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT