rohit sharma suryakumar yadav jasprit bumrah may leave mumbai indians after ipl 2024 amd2000 yandex
Sports

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! रोहितसह हे २ खेळाडू सोडणार संघाची साथ

Mumbai Indians, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचा संघ चर्चेत आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याला संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली.

Ankush Dhavre

IPL 2024, Mumbai Indians:

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचा संघ चर्चेत आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याला संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत.

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना रोहित शर्मा नाराज आहे. त्यामुळे आगामी हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान केवळ रोहित शर्मा नव्हे तर रोहितसह,जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव देखील मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतात.

रोहित, बुमराह आणि सूर्यकुमार यादव सोडणार मुंबईची साथ?

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्मासह,जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवा देखील आयपीएल २०२४ स्पर्धेनंतर मुबंई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतात. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. रोहितने १४ वर्ष, सूर्यकुमार यादवने ९ वर्ष आणि जसप्रीत बुमराहने १२ वर्ष या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडूंमध्ये आणि टीम मॅनेजमेंटमध्ये असलेल्या मतभेदांमुळे रोहित शर्मा संघ सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो. काही वृत्तांमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्माकडे पुन्हा एकदा मुबंई इंडियन्स संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. मात्र मैदानावरील चित्र पाहता, रोहितने मुंबई इंडियन्स सोडण्याचा प्लान केला आहे, असं दिसून येत आहे. (Cricket news in marathi)

रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुबंई इंडियन्सने ५ वेळेस आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी २०१ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५,११० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३१ अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३ सामन्यांमध्ये केवळ ६९ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sheera Recipe: मऊ लुसलुशीत रव्याचा शिरा कसा बनवायचा?

Maharashtra Travel : इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत करा किल्ल्यावर भटकंती, 'हे' ठिकाण यादीमध्ये पाहिजेच

Kitchen Hacks : बटाटा ५ मिनिटांत उकडेल, हा सुपर हॅक एकदा नक्कीच वापरा

BJP : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

SCROLL FOR NEXT