rohit sharma virat kohli saurabh netrawalkar google
Sports

IND vs USA, Rohit Sharma: अमेरिकेच्या संघात 'बोरीवली बॉईज'; रवी शास्त्रींच्या प्रश्नावर रोहित काय म्हणाला?

Borivali Boyz In USA Squad, Rohit Sharma Statement: भारतीय संघाने अमेरिकेविरुद्ध झालेल्या समन्यात जोरदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.या सामन्यात भारतीय संघाने घरच्या मैदानावर अमेरिकेचा ७ गडी राखून पराभव केला आहे. हा भारतीय संघाचा या हंगामातील सलग तिसरा विजय ठरला आहे. या विजयासह भारतीय संघाने सुपर ८ फेरीत धडक दिली आहे. दरम्यान सामन्यानंतर मुलाखत घेत असलेल्या रवी शास्त्रींनी रोहित शर्माला बोरीवली बॉईज बाबत प्रश्न विचारला, यावर रोहितने हटके उत्तर दिलं आहे.

अमेरिकेला नमवल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, ' हा सामना जिंकणं कठीण जाईल, याची कल्पना होतीच. पण दुबे आणि सूर्याने संयमी खेळी केली आणि भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. '

यासह रोहितने अमेरिकेकडून खेळत असलेल्या भारतीय खेळाडूंचं तोंडभरून कौतुकही केलं. रवी शास्त्रींनी बोरीवली बॉईजबाबत प्रश्न विचारला, त्यावेळी रोहित म्हणाला की,' यापैकी बरेच खेळाडू आहेत ज्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलो आहे. या खेळाडूंची प्रगती पाहून खरंच आनंद होतोय. या खेळाडूंना गेल्यावर्षी एमएलसीमध्ये( मेजर लीग क्रिकेट) खेळताना पाहिलं होतं. हे सर्वच खेळाडू मेहनती आहेत.'

अमेरिकेचा निम्म्यापेक्षा अधिक संघ हा भारतीय खेळाडूंनी भरलेला आहे. सौरभ नेत्रावलकर, नितीश कुमार, हरमीत सिंग आणि जसदीप सिंगसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. सौरभ नेत्रावलकर आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही मुंबईच्या अंडर १५ संघाकडून एकत्र खेळले आहेत.

त्यानंतर २०१० मध्ये तो भारतीय संघाकडून अंडर १९ वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यावेळी त्याला केएल राहुल, मयांक अगरवाल आणि संदीप शर्मासारख्या स्टार खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली होती. तर हरमीत सिंग आणि रोहित शर्मा हे दोघेही एकाच शाळेत होते.

तसेच रोहित पुढे म्हणाला की, अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी केली. आम्हाला गोलंदाजीतील पर्याय पाहायचे होते. त्यामुळे शिवम दुबेला गोलंदाजी करण्याची संधी दिली. सुपर ८ मध्ये पोहोचणं दिलासा देणारं आहे. मात्र या मैदानावर खेळणं मुळीच सोपं नव्हतं. या मैदानावर सामना कुठल्याही संघाच्या दिशेने फिरू शकत होता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT