rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Statement: 'आम्हाला शेवटपर्यंत लढायचं होतं, पण..',दारुण पराभवासाठी रोहितने कुणाला जबाबदार ठरवलं?

IND vs AUS 4th Test, Rohit Sharma Statement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवाला कारणीभूत कोण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी ३४० आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १५५ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाकडून त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. दरम्यान हा सामना गमावल्यानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा? जाणून घ्या.

सामन्यानंतर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ' हे खूप निराशाजनक आहे. आम्हाला शेवटपर्यंत लढायचं होतं. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. संपूर्ण कसोटी सामन्यात आम्हाला संधी मिळाल्या पण, आम्हाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. आम्ही हवा तसा खेळ करु शकलो नाही. '

तसेच तो पुढे म्हणाला, ' चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर मी माझ्या रुममध्ये गेलो आणि विचार केला की एक कर्णधार म्हणून आम्ही काय करु शकतो. आम्ही सर्वकाही केलं, पण त्यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेली भागीदारी आम्हाला महागात पडली. आम्हाला माहित होतं की, ३४० धावांचा पाठलाग करणं मुळीच सोपं नसेल. आम्हाला चांगली सुरुवात करुन शेवटच्या २ सत्रांसाठी विकेट शिल्लक ठेवायच्या होत्या. पण त्यांनी शानदार गोलंदाजी केली. '

यासह रोहितने जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले, तो म्हणाला,' तो अप्रतिम आहे. आम्ही त्याला गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय. इथे येऊन त्याने आपलं काम पूर्ण केलंय. तो आकडेवारी पाहत नाही. त्याला देशासाठी खेळायचं आहे. त्याला देशासाठी चांगली कामगिरी करायची आहे. हीच त्याची भूमिका आहे. '

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३० धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT