rohit sharma statement  twitter
क्रीडा

Rohit Sharma Statement: 'एक वेळ आम्हाला वाटलं होतं की..', ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

India vs New Zealand : या सामन्यानंतर रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Statement:

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये थरारक सामना पार पडला. धरमशाळेच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २७४ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १२ चेंडू शिल्लक राखून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा...

हा सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने म्हटले की, ' रोहित शर्माने मिळालेल्या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार केला. त्याला या खेळपट्टीवर खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्याने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली.

एक वेळ आम्हाला वाटलं होतं की, आम्हाला ३०० पेक्षा अधिक धावांचं आव्हान मिळेल. मात्र आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत त्यांना रोखलं. मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतोय. माझी आणि शुभमनची खेळण्याची शैली वेगळी आहे. मात्र आम्हाला याची पुरेपूर जाणीव आहे. आमचा संघ जिंकलाय, याचा आम्हाला आनंद आहे. मला जास्त काही बोलायचं नाही.'

तसेच विराट कोहली आणि रविंद्र जडेजाबाबत बोलताना तो म्हणाला की, ' गेल्या अनेक वर्षांपासून तो संघासाठी अशी इनिंग खेळतोय. संघ अडचणीत असताना विराट आणि जडेजाने संघाला अडचणीतून बाहेर काढलं. आम्हाला क्षेत्ररक्षणात सुधार करण्याची गरज आहे. आज आम्हाला हवं तसं क्षेत्ररक्षण करता आलं नाही. मात्र जडेजा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे, याबाबतीत कुठलीच शंका नाही.' (Latest sports updates)

पुढे तो म्हणाला की, ' कधी कधी क्षेत्ररक्षकांकडून चुका होतात. आम्ही देशतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ खेळतोय. सतत प्रवास करतोय. आम्हाला प्रवास करायला आवडतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT