rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Runout: रोहित स्वतःच्या चुकीमुळेच आऊट झाला? नेमकं काय घडलं? पाहा Video

Rohit Sharma - Shubman Gill Runout: आयसीसी टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर तो एकही सामना खेळला नव्हता. मात्र अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या कमबॅक सामन्यात तो निराशाजनक कामगिरी करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Runout News:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा तब्बल १ वर्षांनंतर टी -२० क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला. आयसीसी टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर तो एकही सामना खेळला नव्हता. मात्र अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या कमबॅक सामन्यात तो निराशाजनक कामगिरी करताना दिसून आला आहे. या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान त्याच्या रनआऊटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली.

रोहितने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर शॉट मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. रोहित धावला मात्र गिल चेंडूकडे पाहत राहिला. त्याने हाताने इशारा करत रोहितला थांबायला सांगितलं. या संधीचा सोनं करत अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी रोहितला रनआऊट केलं. (Cricket News In Marathi)

रोहित भडकला..

शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित जोरदार भडकला. तो पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना गिलला काहीतरी म्हणताना दिसून आला. रोहित शून्यावर बाद झाल्यानंतर गिल अवघे काही मिनिटं खेळपट्टीवर टिकू शकला. त्यानंतर तो २३ धावा करत माघारी परतला.

नेमकी चूक कोणाची?

रोहितने शॉट खेळल्यानंतर गिलला धावण्याचा इशारा केला. मात्र गिलने त्याच्याकडे पाहिलच नाही. तो चेंडूकडे पाहत राहिला. त्याने रोहितला हाताने इशारा करत थांबायला सांगितलं. त्यामुळे दोघांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच रोहित बाद होऊन माघारी परतला. मात्र शिवम दुबेच्या आक्रमक ६० धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने हा सामना ६ गडी राखून जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

SCROLL FOR NEXT