rohit sharma with virat kohli  saam tv
Sports

World Cup 2023: विराटने 'या' क्रमांकावर फंलदाजीला यावं तर रोहितने ओपनिंग सोडावी! WC साठी शास्त्री गुरूजींनी सांगितला मास्टरप्लान

Ravi Shastri On ODI World Cup 2023: वर्ल्डकप जिंकण्यासाठी रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला मास्टरप्लान सांगितला आहे.

Ankush Dhavre

Ravi Shastri Statement On Team India Batting Order:

भारतीय संघाला यावर्षी आशिया चषक आणि वनडे वर्ल्डसारख्या काही महत्वाच्या स्पर्धा खेळयच्या आहेत. यंदाचा वर्ल्डकप भारतात रंगणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. येत्या काही दिवसात या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

दरम्यान या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला विजयाचा मुलमंत्र दिला आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या 'सिलेक्शन डे' या कार्यक्रमात बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटले की, ईशान किशनला टॉप ऑर्डरला फलंदाजीला पाठवणं योग्य ठरेल. भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला प्रचंड अनुभव आहे. तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फंलदाजीला येऊ शकतो. तो डावाची सुरूवात करण्यासाठी देखील मैदानावर येऊ शकतो. तर तुम्ही शुबमन गिलला डावाची सुरूवात करण्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला सांगितलं तर त्याला कसं वाटेल? जर विराटला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.'

तसेच ते पुढे म्हणाले की, 'जसं की मी सांगितलं की, कोणालाच चौथ्या क्रमांकावर खेळायचं नाही. जर संघाची गरज भागवण्यासाठी विराटला चौथ्या क्रमांकावर यावं लागलं तर त्याने ते ही करावं. मी गेल्या दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्येही हा विचार केला होता. मी एमएसकेसोबत यावर चर्चा केली होती. जर तु्म्ही सुरुवातीलाच २ किंवा ३ विकेट्स गमावले तर तुम्हाला कमबॅक करण्याची संधी नसते आणि अनेकदा असंच झालं आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो. त्याने या क्रमांकावर खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे. ' (Latest sports updates)

रवी शास्त्री यांचं म्हणंण आहे की, ईशान किशन आणि शुबमन गिलने डावाची सुरुवात करावी. तर कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या आणि विराट कोहली नियमित स्थानी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं. तिसऱ्या क्रमांकावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या चौथ्या क्रमांकावर खेळतानाही दमदार कामगिरी केली आहे. त्याने या क्रमांकावर खेळताना ३९ डांवामध्ये १७६७ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT