ROHIT SHARMA twitter
क्रीडा

IND vs BAN: आकाश दीप रॉक्स! रोहित शर्मा शॉक! हिटमॅनची रिॲक्शन तुफान व्हायरल - VIDEO

Rohit Sharma Reaction Viral Video: कानपूर कसोटीत रोहित शर्माने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

IND vs BAN, Rohit Sharma Reaction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने हटके रिअॅक्शन दिली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आकाश दीपने रोहित शर्माला रिव्ह्यू घेण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या डावातील १३ वे षटक टाकण्यासाठी आकाश दीप गोलंदाजीला आला. त्यावेळी शादमान इस्लाम फलंदाजी करत होता. आकाश दीपने टाकलेला चेंडू शादमान इस्लामच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी खेळाडूंनी जोरदार अपील केली.

मात्र अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं. मात्र आकाश दीपला विश्वास होता की, चेंडू यष्टीला जाऊन लागणार. त्यामुळे त्याने रोहितकडे रिव्ह्यू घेण्याची मागणी केली. मात्र रोहित काही तयार नव्हता. तरीही आकाश दीप आपल्या मागणीवर अडून राहिला. शेवटी रोहितने रिव्ह्यू घेतला.

रिव्ह्यूमध्ये पाहिलं असता, असं दिसलं की चेंडू टप्पा पडून पॅडला लागला. हा चेंडू थेट यष्टीला जाऊन धडकणार होता. त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. यासह बांगलादेशला दुसरा धक्का बसला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT