Irfan Pathan Reaction Rohit Sharma Drop Sydney Test saam tv
Sports

Irfan Pathan: रोहितने अहंकाराला बाजूला ठेवून...; कर्णधाराने स्वतःला ड्रॉप करताच काय म्हणाला इरफान पठाण?

Irfan Pathan Reaction Rohit Sharma Drop Sydney Test: पाचव्या सामन्यात रोहितचा प्लेईंग ११ मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान सामन्यापूर्वीचा हा निर्णय झाल्याची माहिती असून टीमच्या आत काहीही आलबेल असल्याचंही समजतंय.

Surabhi Jayashree Jagdish

सिडनीमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला ड्रॉप करण्यात आलं आहे. पाचव्या सामन्यात रोहितचा प्लेईंग ११ मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान सामन्यापूर्वीचा हा निर्णय झाल्याची माहिती असून टीमच्या आत काहीही आलबेल असल्याचंही समजतंय. अशातच रोहित शर्मावर टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने मोठं विधान केलं आहे.

रोहितचा निर्णय ठरला वादग्रस्त

रोहित शर्माचे सिडनी टेस्टमधून बाहेर पडणे हा मोठा वादग्रस्त मुद्दा बनल्याचं दिसून आलं. सध्या कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील मतभेदाची चर्चा वाढत असल्याचीही चर्चा आहे. या सर्व घटना पाहून इरफान पठाणने रोहित शर्माच्या या मोठ्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहितची बॅट चांगला खेळ करू शकली नाही. या सिरीजमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत पाच डावांमध्ये केवळ 31 रन्स केले आहेत. अशा स्थितीत कर्णधार इरफान पठाण म्हणाला की, कदाचित खूप खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याने स्वतःला वगळणंच योग्य मानले. अशा प्रकारे त्याने टीमचं हितही जपलं आहे.

काय म्हणाला इरफान पठाण?

इरफान पठाण म्हणाला, "रोहित शर्मा विचार करत आहे की बॅट अजिबात चांगली खेळी करत नाहीये. यावेळी रोहितला स्वतःला कळून चुकलं आहे की, तो लढण्याच्या मूडमध्ये नाहीये. कदाचित रोहितला वाटलं असेल की, अशा परिस्थितीत ब्रेक घेणं योग्य आहे. याबाबत त्यानेही विचार केला. शुबमन गिल चांगला खेळत होता. कर्णधार म्हणून स्वतःला ड्रॉप करणं प्रत्येक खेळाडूला जमत नाही.

रोहितने अहंकार सोडला

इरफान पठाणच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने आपला अहंकार बाजूला ठेवून हा निर्णय घेतला आहे. हा अहंकारमुक्त निर्णय आहे. आज रोहित शर्माने जे केलं आहे, ते तुम्हाला जगातील कोणताही कर्णधार करताना दिसणार नाही. ज्यावेळी तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तेव्हा असं घडतं.

सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाची प्लेईंग ११

यशस्वी जैयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जड़ेजा, नितीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT