Rohit Sharma Emotional Women's World Cup saam tv
Sports

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

Rohit Sharma Emotional Women's World Cup: महिला टीमने वर्ल्डकप ट्रॉफी उंचावल्यानंतर रोहित शर्मा आकाशाकडे पाहत होता आणि तो फार भावूक झाला होता. त्याचा हा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

Surabhi Jayashree Jagdish

आयसीसी महिला वर्ल्डकप 2025 मध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची दीर्घ प्रतीक्षा संपवली. यावेळी तब्बल ५२ वर्षांनंतर पहिल्यांदा महिलांनी वर्ल्डकपवर नाव कोरलं.

२०२३ साली नोव्हेंबर महिन्यात टीम इंडियाच्या पुरुषांचा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर देशभरातील संपूर्ण क्रिकेट चाहते महिल्यांच्या वर्ल्डकपची आतुरतेने वाट पाहत होते. रोहित शर्मा देखील हा सामना पाहायला स्टेडियममध्ये उपस्थित होता. या अविस्मरणीय विजयाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माचा भावनिक प्रतिसाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. त्याला पाहून चाहत्यांच्या डोळ्यांतही पाणी आलंय.

भारताच्या विजयावर भावुक झाला ‘हिटमॅन’

भारतीय महिला टीमने मैदानावर किताब जिंकताच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या रोहित शर्माच्या डोळ्यांत आनंद दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की, महिला टीमच्या या यशामुळे तो किती आनंदी आहे. त्याच्या भावनांनी चाहत्यांनाही भारावून टाकलं.

दिग्गजांच्या उपस्थितीत भारताचा गौरव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित होते. सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सुनील गावस्कर आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनी भारतीय महिला टीमला प्रोत्साहन दिले. या सर्वांच्या उपस्थितीत भारतीय संघाने वर्ल्डकप उंचावला आणि संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला.

19 नोव्हेंबरच्या जखमेवर अखेर मलम

महिला टीमच्या या विजयाने भारतीय चाहत्यांच्या जुन्या जखमेवर मलम लावला आहे. 19 नोव्हेंबर 2023 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पुरुषांच्या वर्ल्डकप अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात आहेत. मात्र महिला टीमच्या या ऐतिहासिक विजयाने चाहत्यांना आनंद साजरा करण्याची मोठी संधी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

ONGC Recruitment: खुशखबर! ONGCमध्ये नोकरीची संधी; २६२३ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai Metro: मुंबईकारांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा मेट्रो होणार ६ डब्यांची, प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; काय आहे प्लान?

SCROLL FOR NEXT