IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

Indian Women's Cricket Team World Cup Win: २ नोव्हेंबर २०२५ हा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. गेल्या ५२ वर्षांपासून महिला विश्वचषकाच्या इतिहासात जो बदल झाला नव्हता, तो हरमनप्रीत कौरच्या 'वूमन इन ब्लू' संघाने करून दाखवला.
IND W vs SA W Final
IND W vs SA W Finalsaam tv
Published On

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय टीमचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. आज नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये रंगलेल्या झालेल्या या सामन्यात भारतीय टीमने 52 रन्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पहिल्यांदाच महिला वर्ल्डकप कब्जा केला. यावेळी दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

या सामन्यात टीमने सात विकेट्स गमावून 298 रन्स केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.3 ओव्हर्समध्ये 246 रन्सवर गारद झाला. दरम्यान अंतिम सामन्यात भारताच्या विजयात तीन खेळाडूंचा महत्त्वाचा वाटा होता. शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माने ऑलराउंड कामगिरी केली. तर अमनजोतने उत्कृष्ट फिल्डींग केली.

IND W vs SA W Final
IND-W vs SA-W: 'हा विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देणारा', महिला संघाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

या सामन्यात ओपनर फलंदाज शेफाली वर्माने 87 रन्स केले. याशिवाय तिने दोन विकेट्सही घेतले. तर दीप्ती शर्माने 58 रन्स करत पाच विकेट्स घेतल्या. यावेळी तिने दक्षिण आफ्रिकेच्या टीमची कंबर मोडली. या तिन्ही खेळाडूंच्या उत्तम कामगिरीमुळे भारताला किताब जिंकणं सोपं झालं

IND W vs SA W Final
Shefali Verma History: 'लेडी सेहवाग'चा धमाका; वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात बनवलं शेफालीनं बनवला रेकॉर्ड

या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. ताजमिन ब्रिट्स आणि कर्णधार लॉरा वोलवार्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 51 रन्सची पार्टनरशिप केली. ही पार्टनरशिप अमनजोत कौरने मोडली. तिने एकदम वेगाने थ्रो करून ताजमिनला रनआऊट केलं. मात्र आफ्रिकन कर्णधार वोलवार्ट क्रीजवर टिकून राहिली आणि तिने शतक पूर्ण केलं.

IND W vs SA W Final
World Cup 2025: चक दे इंडिया! भारताच्या पोरींनी अखेर करून दाखवलंच; ICC वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच कोरलं नाव

सुने लुस (25 रन्स) आणि एनेरी डर्कसेन (35) यांनीही कर्णधाराला साथ दिली. दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 39.2 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 209 रन्स असा होता. मात्र यानंतर दीप्ती शर्माच्या जबरदस्त स्पेलने आफ्रिकेचा पराभव निश्चित केला. दीप्ती शर्माने 9.3 ओव्हर्समध्ये 39 रन्स देत पाच विकेट्स घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com