rohit sharma record news rohit will play his 200th ipl match in mi vs srh match  yandex
Sports

Rohit Sharma Record: रोहित शर्मा रचणार इतिहास! हार्दिक सोडा, जे सचिनलाही नाही जमलं ते करुन दाखवण्याची संधी

Rohit Sharma, MI vs SRH IPL 2024: कर्णधारपद रोहितकडे नसलं तरी चर्चा मात्र रोहित शर्माचीच आहे. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिक नाणेफेकीला आला त्यावेळी देखील रोहित.. रोहितच्या घोषणा दिल्या जात होत्या.

Ankush Dhavre

Rohit Sharma Record News:

कर्णधारपद रोहितकडे नसलं तरी चर्चा मात्र रोहित शर्माचीच आहे. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिक नाणेफेकीला आला त्यावेळी देखील रोहित.. रोहितच्या घोषणा दिल्या जात होत्या. गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यात रोहित शर्माला एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात रोहितने ४३ धावांची शानदार खेळी केली. मुंबईला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. मात्र त्यानंतर रोहितने मुंबईचा डाव सांभाळला. मात्र रोहित बाद झाल्यानंतर रोहितच्या हातून सामना निसटला. आता रोहित शर्मा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना २७ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणारा सामना हा रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघासाठी २०० वा सामना असणार आहे. रोहितला वगळलं तर इतर कुठल्याही खेळाडूला मुंबई इंडियन्स संघाकडून २०० सामन खेळता आलेले नाहीत. मुख्य बाब म्हणजे हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरलाही करता आलेला नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणारा सामना हा रोहित शर्मासाठी अतिशय खास असणार आहे. (Cricket news in marathi)

मुंबईचा पराभव...

आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकअखेर ६ गडी बाद १६८ धावा केल्या. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावांची गरज होती. मात्र मुंबईला या सामन्यात केवळ ९ गडी बाद १६२ धावा करता आल्या. मुंबईला हा सामना ६ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT