Rohit Sharma Record in odi cricket twitter
Sports

IND vs SL, Asia Cup 2023: मुंबई लोकल बनली बुलेट ट्रेन! स्लोवेस्ट २००० ते फास्टेस्ट १०००० धावा, रोहितची विक्रमी कामगिरी

Rohit Sharma Record: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

India vs Srilanka, Asia Cup 2023:

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये सुपर ४ फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.कारण जो संघ हा संघ जिंकेल तो आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरूवात करून दिली. दरम्यान २३ धावा करताच त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.

रोहितचा मोठा रेकॉर्ड..

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत त्याने संघाला चांगली सुरूवात करून दिली होती.

दरम्यान त्याने २३ धावा करताच वनडे क्रिकेटमध्ये १०,०००नधावा पूर्ण केल्या आहेत. त्याने श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाच्या चेंडूवर षटकार मारत हा किर्तीमान केला आहे. हा कारनामा त्याने १५९ व्या इनिंगमध्ये केला आहे.

यासह तो वनडेमध्ये सर्वात जलद १०,००० धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. भारतासाठी सर्वात जलद १०,००० धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. तर मास्टर -ब्लास्टर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

मुख्य बाब म्हणजे रोहित शर्माने जेव्हा वनडेत २००० धावा केल्या होत्या,त्यावेळी त्याच्या नावे नको त्या विक्रमाची नोंद झाली होती. तो वनडेत २००० धावा पूर्ण करणारा तिसरा स्लोवेस्ट फलंदाज ठरला होता. त्याने ८९ इनिंगमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या. आता १५९ व्या इनिंगमध्ये त्याने १०००० धावा पूर्ण केल्या आहेत. (Latest sports updates)

वनडेत सलामीवीर म्हणून केला हा मोठा रेकॉर्ड..

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात रोहितने ५३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने वनडेत सलामीला फलंदाजी करताना ८०००धावा पूर्ण केल्या आहेत.त्याची फलंदाजी पाहून असं वाटत होतं की, तो या सामन्यात मोठी खेळी करेल. मात्र दुनिथ वेललागेने त्याला बाद करत माघारी धाडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमधील ध्वजारोहण आदित्य तटकरेंच्या हस्ते होणार

Nashik News: शिंदे गटाच्या बैठकीत तुफान राडा, पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडत शिवीगाळ; पाहा VIDEO

INDIA Alliance Protest: विरोधकांच्या मोर्चादरम्यान महिला खासदार बॅरिगेट्सवर चढल्या, घोषणाबाजी करताना दोघी चक्कर येऊन पडल्या

Radhakrishna Vikhe Patil : केवळ आरोप करून आरक्षण मिळणार आहे का? मंत्री विखे पाटील यांचा जरांगे पाटील यांना सवाल

Dashavatara: बाप-मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये; 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT