rohit sharma jay shah hardik pandya twitter
क्रीडा

IND vs SA, Final: जय शहांची भविष्यवाणी खरी ठरली! रोहित अन् हार्दिकने बारबाडोसमध्ये रोवला तिरंगा; VIDEO

Rohit Sharma Planted The Tiranga in Barbados Field : जय शहांचा शब्द रोहित शर्मा आणि संपूर्ण भारतीय संघाने खरा ठरवला.

Ankush Dhavre

भारतीय संघाने ११ वर्षांची प्रतीक्षा संपवत आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय संघाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं होतं. त्यावेळी कोट्यावधी क्रिकेट फॅन्सच्या डोळ्यात अश्रू आले होते. मात्र यावेळी भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं फायनलमध्ये ७६ धावांची खेळी करणारा विराट कोहली सामन्याचा हिरो ठरला. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि जय शहा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाच्या शानदार विजयानंतर बारबाडोसमध्ये तिरंगा रोवला. यावेळी हार्दिक पंड्या आणि जय शहा देखील उपस्थित होते. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जय शहा यांनी घोषणा केली होती की, आम्हीच टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारताचा तिरंगा रोवणार. त्यावेळी टी -२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. मात्र रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करणार की नाही, हे स्पष्ट झालं नव्हतं. त्यावेळी जय शहा यांनीच खात्री पटवून दिली होती रोहित शर्माच भारतीय संघाचं नेतृत्व करेल.

काय म्हणाले होते जय शहा?

एका कार्यक्रमात बोलताना जय शहा म्हणाले होते की, ' सलग १० सामने जिंकूनही आम्हाला अहमदाबादमध्ये वर्ल्डकपची फायनल जिंकता आली नव्हती. आम्ही वर्ल्डकप जिंकला नसला मात्र आम्ही क्रिकेटत्यांची मनं नक्की जिंकली. मी तुम्हाला आश्वासन देतो की भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकणार आणि बारबाडोसमध्ये भारताचा तिरंगा रोवला जाणार.

भारतीय संघाचा शानदार विजय

बारबाडोसमध्ये पार पडलेल्या या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने संघाची धावसंख्या १७६ धावांवर पोहोचवली. दरम्यान या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT