IND vs WI 2nd Test Rohit Sharma Viral Video: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा मैदानावर असताना आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तर मैदानाबाहेर असताना अनेकदा मजेशीर कृत्य करताना दिसून येत असतो.
नुकताच भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने असे काही मजेशीर कृत्य केले आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
रोहितचा तो व्हिडिओ व्हायरल..
तर झाले असे की, भारत विरुद्व वेस्टइंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु असताना रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये असल्याचे दिसून येत आहे. मात्र काही कारणास्तव त्याला ड्रेसिंग रूममधून बाहेर पाहायचं असतं.
मात्र त्याची बाहेर डोकावून पाहण्याची पद्धत पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तो बाहेर पाहत असताना कन्फ्युज असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स व्हायरल केले आहेत. (Latest sports updates)
भन्नाट मिम्स व्हायरल..
वेस्टइंडीजची विजयाच्या दिशेने वाटचाल..
भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाला विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान दिले आहे. वेस्टइंडीजचा दुसरा डाव २५५ धावांवर संपुष्टात आला होता. यासह भारतीय संघाने दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली होती.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना २ गडी बाद १८१ धावा करत डाव घोषित केला. ईशान किशन नाबाद ५२ धावांवर तर शुबमन गिल नाबाद २९ धावांवर फलंदाजी करत होता.
यासह वेस्टइंडीज संघाला विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान दिले. या धावांचा पाठलाग करताना, वेस्टइंडीज संघाने चौथ्या दिवसअखेर २ गडी बाद ७६ धावा केल्या आहेत. क्रेग ब्रेथवेट २८ आणि मॅकेन्जी खाते ही न खोलता माघारी परतला आहे.
भारतीय संघाकडून आर अश्विनने २ गडी बाद केले आहेत. वेस्टइंडीजला विजयासाठी अजुनही २८९ धावांची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.