मुंबई : दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान आज शनिवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सामना सुरु आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा या हंगामात चांगल्या फॉर्मात आहे. या सामन्यात रोहित शर्माला विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावावर आहे.
विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात सर्वाधिक धावा कुटल्या आहेत. रॉयल चॅलेंज बेंगळुरुकडून खेळताना विराटने दिल्लीच्या विरोधातील २८ सामन्यात १०३० धावा कुटल्या आहेत. तर रोहित शर्माने दिल्ली विरोधात ३४ सामने खेळत १०२६ धावा केल्या आहेत. रोहितने मुंबईशिवाय डेक्कन चार्जर्ससाठी देखील तीन सिझन खेळले आहेत.
रोहितला विराटच्या पुढे जाण्यासाठी फक्त ५ धावांची गरज आहे. विराट कोहली आणि रोहितने दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात १००० धावा करणारे फलंदाज आहेत. रोहितने फक्त ५ धावा केल्यास कोहलीचा विक्रम मोडण्यास यश येईल. कोहलीचा विक्रम मोडल्यास दिल्ली विरोधात सर्वाधिक करणारा खेळाडू रोहित शर्मा ठरेल. रोहितने दिल्ली विरोधात ३४ सामन्यात ६ वेळा अर्धशतक ठोकलं आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात रोहितने आठ सामन्यातून आतापर्यंत ३०३ धावा कुटल्या आहेत. तर विराट कोहलीने ९ सामन्यातून ४३० धावा कुटल्या आहेत.
आयपीएलमध्ये दिल्ली विरोधात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
विराट कोहली - १०३०
रोहित शर्मा - १०२६
अंजिक्य रहाणे - ८५८
रॉबिन उथप्पा - ७४०
एमएस धोनी - ७०९
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.