rohit sharma  yandex
Sports

IND vs NZ: धोनी- विराटच्या नेतृत्वात कधीच असं घडलं नव्हतं! रोहितच्या नावे लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

Rohit Sharma Named Unwanted Captaincy Record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने ३५६ धावांची मोठी आघाडी घेतली होती. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १०३ धावांची आघाडी घेतली आहे.

भारतात कसोटी क्रिकेट खेळताना सलग दुसऱ्यांदा कुठल्याही संघाने भारतीय संघाविरुद्ध खेळताना १०० धावांची आघाडी घेतली आहे.

गेल्या २३ वर्षांत हे पहिल्यांदाच घडलं आहे. यापूर्वी एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वात हे कधीच घडलं नव्हतं. आता रोहित शर्माच्या नावे या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारताचा डाव १५६ धावांवर आटोपला. त्यामुळे पुन्हा एकदा न्यूझीलंडने पुन्हा एकदा १०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वात झाला होता हा रेकॉर्ड

गेल्या वेळी हा रेकॉर्ड झाला होता त्यावेळी सौरव गांगुली हे भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यावेळी मुंबईत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १७३, तर ईडन गार्डनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २७४ धावांची आघाडी घेतली होती. २७४ धावांची आघाडी घेऊनही भारतीय संघाने हा सामना जिंकून इतिहास रचला होता. आता पुणे कसोटी जिंकण्यासाठीही भारतीय संघाला चमत्कार करावा लागणार आहे.

भारताचा डाव १५६ वर आटोपला

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना डेवोन कॉनव्हेने ७६ धावांची शानदार खेळी केली. यासह रचिन रविंद्रने ६५ धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने २५९ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला १५६ धावा करता आल्या. भारतीय संघातील कुठल्याही फलंदाजाला अर्धशतकही झळकावता आलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT