Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Australia vs Tasmania: वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचे ५२ धावांवरुन ५३ धावांवर पोहचण्यासाठी ८ फलंदाज गमावले आहेत.
Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद
australian batsmantwitter
Published On

जर एखाद्या संघाचे ३ गडी बाद ५० धावा झाल्या असतील, तर तो संघ कमीत कमी १०० धावांच्या पुढे जाऊच शकतो. १०० जर जास्त वाटत असतील तर ७ फलंदाज शिल्लक असणारा संघ कमीत कमी ७०-८० धावांपर्यंत तर नक्कीच पोहचेल. मात्र १ धाव करताना ८ फलंदाज बाद झाले तर? तुम्हालाही हे ऐकून आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल. मात्र हे वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत घडलंय.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया यांच्यात झालेल्या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. या संघाकडून डावाची सुरुवात करताना, डार्सी शॉर्ट आणि आरोन हार्डीने मिळून ११ धावा जोडल्या. त्यानंतर शॉर्ट आणि बॅनक्राफ्ट यांनी मिळून ३३ धावा जोडल्या. बॅनक्राफ्ट १४ धावा करत माघारी परतला.

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद
IND vs NZ: 7 विकेट्स घेताच वॉशिंग्टन सुंदरने रचला इतिहास! दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाला ५२ धावांवर तिसरा धक्का बसला. इथपर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. मात्र इथून पुढे विकेट्सची रांग लागली. जोश इंग्लिश १ धाव करत माघारी परतला. त्यानंतर एश्टन एगर, कुपर कॉनॉली, एश्टन टर्नर, हिल्टन कार्टराईट, जे रिचर्डसन, लांस मोरिस आणि जोएल पेरिस हे फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतले.

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद
IND vs NZ 2nd Test: ‘एक दम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए’ एकाच सेशनमध्ये भारताचा डाव गडगडला

या सामन्यात तस्मानियाचे गोलंदाज चमकले. तस्मानियाकडून बियू वेबस्टरने १७ धावा खर्च करत सर्वाधिक ६ गडी बाद केले. तर स्टेनलेकने ३ गडी बाद केले. तर टॉम रॉजर्सने १ गडी बाद केला. ५२ वरुन ५३ धावांवर येण्यासाठी म्हणजेच १ धाव करण्यासाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज तंबूत परतले. मात्र यादरम्यान कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रीक घेतली नाही.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने तस्मानियासमोर जिंकण्यासाठी ५४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना, तस्मानियाने ५५ धावा करत सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com