Rohit sharma mother saam tv
Sports

Rohit Sharma Mother: 'माझं स्वप्न मुलाने पूर्ण केलं..' वर्ल्डकप विजयानंतर रोहितच्या आईंची पहिलीच प्रतिक्रिया -VIDEO

Rohit Sharma Mother Reaction: रोहित शर्माच्या घवघवीत यशानंतर त्याच्या आईंची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे. पाहा व्हिडिओ

Ankush Dhavre

भारतीय संघाने बारबाडोसमध्ये इतिहास रचला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तब्बल १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी भारतात परतली.

या विजयाचा मुंबईत जोरदार जल्लोष झाला. नरिमन पॉईंट ते मरीन ड्राईव्हपर्यंत ओपन बस परेडचे आयोजन केले गेले होते. तर वानखेडे स्टेडियमवर खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलाचं घवघवीत यश पाहण्यासाठी रोहितच्या आईंनी देखील वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनी पहिल्यांदाच रोहितच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या रोहितच्या आई?

वर्ल्डकप विजेत्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर तासनतास रस्त्यावर वाट पाहत उभे होते. ज्यात रोहित शर्माच्या आई -वडिलांचाही समावेश होता. रोहित आल्यानंतर त्याच्या आईंनी त्याला मिठी मारली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या की, ' माझ्यासाठी खूप गर्वाची बाब आहे. दोन वर्ल्डकपच्या वेळी माझा मुलगा उपस्थित होता. त्याने पूर्ण देशाचे नाव उंचावले आहे. माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझे स्वप्न त्याने पूर्ण केले.' मुख्य बाब म्हणजे त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट सोडून रोहितला भेटण्यासाठी आल्या होत्या.

भारतीय संघाने २९ जून रोजी टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्यानंतर १ जुलै रोजी भारतीय संघ मायदेशात येणार होता. मात्र चक्रीवादळामुळे भारतीय खेळाडू मायदेशी येऊ शकले नाही. दरम्यान ३ जुलै रोजी एअर इंडियाचं विमान भारतीय खेळाडूंना घेऊन मायदेशी येण्यासाठी निघालं. त्यानंतर ४ जुलै रोजी ते विमान भारतात दाखल झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT