Rohit Sharma: 'रोहित भाई ट्रॉफी दिखा दो..' फॅनच्या त्या मागणीवर रोहितने दिलेली रिॲक्शन व्हायरल - VIDEO
rohit sharmatwitter

Rohit Sharma: 'रोहित भाई ट्रॉफी दिखा दो..' फॅनच्या त्या मागणीवर रोहितने दिलेली रिॲक्शन व्हायरल - VIDEO

Rohit Sharma Viral Video: भारतीय संघ वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन मायदेशात दाखल जाणार आहे.दरम्यान रोहितचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.
Published on

आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ भारतात दाखल झाला आहे. १ जूनपासून सुरु झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. शेवटी २९ जून रोजी झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. यापूर्वी २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. दरम्यान वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकून भारतात आल्यानंतर खेळाडूंचं जोरदार स्वागत केलं गेलं आहे.

दिल्लीत जंगी स्वागत

भारतीय संघाने २९ जूनला दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. त्यानंतर १ जुलैला भारतीय संघ मायदेशी येण्यासाठी निघणार होता. हा संघ २ जुलै रोजी भारतात दाखल होणार होता. मात्र बारबाडोसमध्ये चक्रीवादळ आल्याने विमानं रद्द करण्यात आली होती. बुधवारी बीसीसीआयने एअर इंडियाचं स्पेशल चार्टर्ड विमान पाठवलं. गुरुवारी सकाळी ६ वाजता भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला आहे.

Rohit Sharma: 'रोहित भाई ट्रॉफी दिखा दो..' फॅनच्या त्या मागणीवर रोहितने दिलेली रिॲक्शन व्हायरल - VIDEO
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

भारतीय संघ दिल्लीत येणार म्हणून क्रिकेट फॅन्सने मध्यरात्रीपासूनच दिल्ली विमानतळावर गर्दी केली होती. सकाळी ६ वाजता भारतीय खेळाडू दिल्लीत पोहोचले. त्यानंतर विमानतळाबाहेर भारतीय खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. क्रिकेट फॅन्स घोषणा देताना दिसून आले. यासह रोहितनेही डान्स केला. ज्यावेळी रोहित टीम बसमध्ये होता. त्यावेळी फॅन्सने त्याला ट्रॉफी दाखवण्याची मागणी केली. त्यावेळी रोहितने लगेच ट्रॉफी दाखवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Rohit Sharma: 'रोहित भाई ट्रॉफी दिखा दो..' फॅनच्या त्या मागणीवर रोहितने दिलेली रिॲक्शन व्हायरल - VIDEO
Team India Come Home: जल्लोष तर होणारच! भारतात येताच रोहितचा फॅन्ससोबत भन्नाट डान्स, पाहा VIDEO

दिल्लीत पोहोचल्यानंतर भारतीय संघ ITC Maurya हॉटेलमध्ये थांबणार आहेत. या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरही वर्ल्डकप विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. त्यानंतर ११ वाजता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता मुंबईतील मरीन ड्राईव्हवर विजयी रॅली काढली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com