virat kohli with rohit sharma saam tv
Sports

IND vs SL, ODI Series: रोहित, राहुल अन् श्रेयस वनडे मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल! विराट कुठंय?

India vs Sri Lanka ODI Series: ३ टी-२० सामन्यांची मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. या स्पर्धेनंतर तो काही दिवस क्रिकेटपासून दूर होता. निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्याला टी-२० संघात स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र तो वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार आहे. रोहितसह केएल राहुल आणि श्रेयस अय्यरही अॅक्शनमध्ये दिसून येणार आहेत. हे खेळाडू वनडे मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाले आहेत.

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका झाल्यानंतर वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेला २ ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे. मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये पार पडणार आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल,श्रेयस अय्यर, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हर्षित राणा हे कोलंबोत दाखल झाले आहेत. यासह असिस्टेंट कोच अभिषेक नायरदेखील कोलंबोत दाखल झाले आहेत. हे खेळाडू विश्रांती केल्यानंतर वनडे मालिकेचा सराव करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. वनडे मालिकेसाठी निवड झालेल्या संघात काही खेळाडू असे आहेत,जे टी-२० संघाचा भाग आहेत. त्यामुळे हे खेळाडू पल्लेकलेहून थेट कोलंबोला रवाना होणार आहे.

भारताचा युवा स्टार फलंदाज शुभमन गिल टी-२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृ्त्व करतोय. यासह मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग आणि शिवम दुबे हे टी-२० संघाचा भाग आहेत. हे खेळाडू थेट कोलंबोला रवाना होणार आहेत. टी-२० मालिका झाल्यानंतर हार्दिक पंड्या मायदेशी परतू शकतो. कारण ही मालिका सुरु होण्यापूर्वीच त्याने वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे म्हटले होते.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर

Diabetes Care: डायबेटीज झालाय? भात खाणं सोडू नका, डॉक्टरांनी सगळ्या शंका केल्या दूर... वाचा नेमकं काय सागितलं

Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्यासाठी कोणता योगा करावा? जाणून घ्या

Reduce sugar intake: तुमच्या आहारातून शुगर इंटेक कसा कमी कराल? पाहा सोपे मार्ग

Terror Attack : लग्नात दहशतवादी हल्ला, ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी, भारताचा शेजारी देश हादरला

SCROLL FOR NEXT