Virat Kohli Record: विराटच्या रडारवर सचिनचा महारेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरणार जगातील पहिलाच फलंदाज

Virat Kohli Can Break Sachin Tendulkar Racord: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.
virat kohli sachin tendulkar
virat kohli sachin tendulkaryandex
Published On

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेतून विराट कोहली कमबॅक करताना दिसून येणार आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फानयलचा सामना झाल्यानंतर विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. महिन्याभराच्या विश्रातीनंतर तो अॅक्शनमध्ये दिसणार आहे. दरम्यान या मालिकेत त्याला भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

virat kohli sachin tendulkar
Sri Lanka Squad, IND vs SL: टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

सचिनचा रेकॉर्ड मोडण्यापासून १ पाऊल दूर

विराट कोहली जेव्हा श्रीलंकेत खेळतो, त्यावेळी त्याचा विस्फोटक अंदाज पाहायला मिळत असतो. भारतीय संघाचे वनडे मालिकेतील सामने कोलंबोत होणार आहे. या मैदानावर खेळताना विराटने धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे श्रीलंकेचे गोलंदाज नक्कीच चिंचेत असणार. दरम्यान या मालिकेत तो श्रीलंकेत वनडे खेळताना सर्वाधिक शतकं झळकावणारा परदेशी फलंदाज बनू शकतो. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत खेळताना प्रत्येकी ५ शतकं झळकावली आहे. केवळ १ शतक झळकावताच या मोठ्या रेकॉर्डमध्ये तो सचिन तेंडुलकरला मागे सोडू शकतो.

virat kohli sachin tendulkar
Team India Captain: ना हार्दिक,ना सूर्या; शुभमन गिल होणार भविष्यातील कर्णधार! ही आहेत प्रमुख कारणं

हा मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

विराट वनडे क्रिकेटमध्ये शतकांचा बादशाह आहे. त्याने सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत सचिनलाही मागे सोडलं आहे. आता त्याच्याकडे श्रीलंकेत आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. जर त्याने मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये शतक झळकावलं, तर तो श्रीलंकेत सर्वाधिक शतकं झळकावणारा परदेशी फलंदाज ठरेल. श्रीलंकेत खेळताना सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आतापर्यंत वनडे आणि कसोटीमध्ये ५-५ शतकं झळकावली आहेत. तर दुसरीकडे विराटने वनडेमध्ये ५ आणि कसोटीत २ अशी ७ शतकं झळकावली आहेत. त्यामुळे ३ शतक झळकावताच तो सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करु शकतो.

virat kohli sachin tendulkar
IND vs SL, 1st T20I: पंत की सॅमसन,रिंकू की शिवम? पहिल्या सामन्यात सूर्या या 11 खेळाडूंना देणार स्थान

असं आहे वनडे मालिकेचं वेळापत्रक

पहिला वनडे सामना - २ ऑगस्ट, वेळ -दुपारी २:३० वाजता

दुसरा वनडे सामना - ४ ऑगस्ट, वेळ - दुपारी २:३० वाजता

तिसरा वनडे सामना- ७ ऑगस्ट - वेळ- दुपारी २:३० वाजता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com